IND vs SL ODI Head to Head: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवारी खेळवला जाणार पहिला वनडे सामना, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड

या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ टी-20 च्या तुलनेत थोडा वेगळा असेल, कारण या फॉरमॅटचे अनेक मजबूत खेळाडू परतले आहेत.

India vs Sri Lanka Schedule 2024

कोलंबो: भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्यावर आपले टी-20 सामने खेळले, ज्यात त्यांनी चमकदार कामगिरी केली आणि मालिका 3-0 ने जिंकली. आता 3 सामन्यांच्या वनडे मालिकेची वेळ आहे, जी 2 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये (IND vs SL ODI Series) खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ टी-20 च्या तुलनेत थोडा वेगळा असेल, कारण या फॉरमॅटचे अनेक मजबूत खेळाडू परतले आहेत. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुलसारखे (KL Rahul) फलंदाज श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग आहेत. (हे दखील वाचा: IND vs SL ODI Series 2024: कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवली जाणार भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका, कसा आहे या मैदानावर भारताचा रेकाॅर्ड? एका क्लिकवर घ्या जाणून)

आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व?

आत्तापर्यंत टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात एकूण 168 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 99 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत. दरम्यान, 1 सामना बरोबरीत असून 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. पाहिले तर टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे. मागील 6 एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने सर्व सामन्यांमध्ये श्रीलंकेला पराभूत केले आहे. श्रीलंकेने शेवटची वेळ 2021 मध्ये टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय सामना जिंकला होता.

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 15 एकदिवसीय मालिका जिंकल्या आहे

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 20 द्विपक्षीय वनडे मालिका खेळल्या गेल्या आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 15 मालिका विजय नोंदवले आहेत आणि श्रीलंकेविरुद्ध फक्त 2 मालिका जिंकण्यात यश मिळवले आहे. याशिवाय 3 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. टीम इंडियाने श्रीलंकेच्या भूमीवर 5 मालिका जिंकल्या आहेत आणि 2 गमावल्या आहेत. श्रीलंकेने 28 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाला घरच्या मैदानावर पराभूत केले आहे आणि 32 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

एकदिवसीय मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये सुरू होईल, त्यातील तिन्ही सामने आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले जातील. मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना 4 ऑगस्ट रोजी तर मालिकेतील शेवटचा सामना 7 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेपासून गंभीरच्या प्रशिक्षक स्टाफमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील होण्याची अपेक्षा आहे.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.

वनडे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ: चरित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सादिरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, झेनिथ लियानागे, निशान मदुष्का, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलागे, चमिका करुणारत्ने, महिष थेक्षाना, अकिला धनंजय, असिथा फर्नांडो, कुसल जानिथ, प्रमोद मदुशन आणि जेफ्री वँडरसे.