IND vs SA 3rd T20I 2024 Preview: तिसऱ्या टी-20 सामन्यात सेंच्युरियनमध्ये भिडणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, त्याआधी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल आणि स्ट्रीमिंगसह जाणून घ्या संपूर्ण तपशील
तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन करत पाहुण्या संघाचा 3 गडी राखून पराभव केला. यासह यजमान संघाने चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
South Africa National Cricket Team vs Indian National Cricket Team 3rd T20 2024: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा टी-20 सामना 13 नोव्हेंबर रोजी सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन करत पाहुण्या संघाचा 3 गडी राखून पराभव केला. यासह यजमान संघाने चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता तिसरा टी-20 जिंकून मालिकेत आघाडी घेण्यावर दक्षिण आफ्रिकेच्या नजरा असतील. दुसरीकडे, टीम इंडियाला तिसऱ्या टी-20मध्ये यजमान संघाचा पराभव करून पुनरागमन करायचे आहे. दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
दोन्ही संघांमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत एकूण 29 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाचा वरचष्मा दिसत आहे. टीम इंडियाने 29 पैकी 16 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 12 सामने जिंकले आहेत. हेड टू हेड रेकॉर्ड पाहता भारतीय संघ अधिक मजबूत असल्याचे स्पष्ट होते. ही मालिका दक्षिण आफ्रिकेत खेळली जात असली तरी. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणे भारतीय संघासाठी तितके सोपे नसेल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याती प्रमुख खेळाडू (Key Players): सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वरुण चक्रवर्ती, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, जेराल्ड कोएत्झी हे काही खेळाडू आहेत ज्यांना सामन्याचा मार्ग बदलता येतो.
मिनी बॅटलमध्ये एकमेकांना अडचणीत आणणारे खेळाडू (Mini Battle): दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज ट्रिस्टन स्टब्स आणि वरुण चक्रवर्ती यांच्यातील सामना रोमांचक होऊ शकतो. याशिवाय संजू सॅमसन आणि गेराल्ड कोएत्झी यांच्यातही चुरशीची स्पर्धा होऊ शकते. मात्र, दोन्ही संघांची फलंदाजी मजबूत आहे. जे गोलंदाजांसाठी मोठे आव्हान असेल. याशिवाय दोन्ही संघांची फळी संतुलित आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी-20 सामना 2024 कधी आणि कुठे खेळवला जाईल?
दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना 13 नोव्हेंबर (बुधवार) रोजी सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे रात्री 08:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक रात्री 08:00 वाजता होईल. (हे देखील वाचा: IND vs SA 3rd T20 2024 Live Streaming: तिसऱ्या टी-20 सामन्यात भारत करणार पुनरागमन की दक्षिण आफ्रिका मालिकेत घेणार आघाडी? 'इथे' जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना)
कुठे पाहणार सामना?
Viacom18 नेटवर्ककडे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचे प्रसारण हक्क आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील Sports18 चॅनेलवर उपलब्ध असेल. या रोमांचक सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग Jio Cinema ॲपवर देखील पाहता येईल, जेथे चाहते त्यांच्या स्मार्टफोन, टॅबलेट किंवा अन्य डिव्हाइसवर कुठूनही सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11:
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ: संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान.
दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ: रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर.