India vs Pakistan ICC World Cup 2019: बाप रे बाप! Father's Day चा संदर्भ देत भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच साठी Star Sports ने शेअर केला हटके प्रोमो (Watch Video)

स्टार स्पोर्ट्स ने देखील यावर एक नवा प्रोमो शेअर करून पाकिस्तानी संघाच्या चाहत्यांना शाब्दिक टोला लगावला आहे.

Stills from the new Mauka Mauka (Photo Credits: Twitter@starsports)

[Poll ID="null" title="undefined"]भारतीय क्रिकेट चाहते ज्या सामन्यासाठी अक्षरशः तहानभूक विसरून वाट पाहू शकतात असा सामना म्हणजे भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan)! येत्या 16 जूनला हा सामना इंग्लंड मध्ये रंगणार आहे मात्र जवळपास एक आठवड्या आधीपासूनच यासाठी रसिकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. या दोन्ही देशांमधील संबंध पाहता सामना रंजक ठरणार हे तर निश्चितच असते मात्र यंदा विशेष म्हणजे हा सामना अगदी फादर्स डे (Father's Day) च्या दिवशीच असल्याने मॅच मध्ये कोण बाप खेळी खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेच औचित्य साधून स्टार स्पोर्ट्स (Star Sports) ने देखील नुकताच एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. मागच्या विश्वचषकात गाजलेलं मौका मौका कॅम्पेन आणि फादर्स डे थीम एकत्र करून बाप रे बाप हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. यातून पाकिस्तानी संघाला आणि त्यांच्या चाहत्यांना घेतलेला शाब्दिक चिमटा भारतीय क्रिकेटप्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

बाप रे बाप (Watch Video)

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा इतिहास पाहता आजवर आईसीसी विश्वचषकाच्या सहा सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघ भारताला एकदाही हरवू शकला नाहीये. त्यामुळे दरवेळी पाकिस्तानी चाहत्यांची निराशा होते आणि ते नवीन संधीची वाट बघत बसतात असा या व्हिडिओचा आशय आहे. या व्हिडीओ मध्ये विकास मल्होत्रा हा अभिनेता पाकिस्तानी संघाचा फॅन दाखवला असून आपल्या वडिलांचा सल्ला आठवत असतो, ज्यात त्याचे वडील त्याला कधीही न हरता जिद्दीने जिंकण्याचा प्रयत्न कर असं सांगतात पण तेव्हा एक भारतीय संघाचा फॅन त्याला मी तुला कधी विचारलं असं विचारून टोमणा मारतो. India vs Pakistan ICC World Cup 2019: भारत संघाविरुद्धच्या सामन्यावेळी पाकिस्तान संघाच्या खेळाडूंनी संयम राखावा, इम्रान खान यांची सूचना

भारताने विश्वचषकात आतपर्यंत लागोपाठ दोन विजय मिळवून दमदार सुरवात केली आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा आणि काल ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करत आता टीम इंडिया आपल्या पुढील आव्हानासाठी तयार झाली आहे. येत्या रविवारच्या या सामन्यात टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध आपल्या विजयाचा रेकॉर्ड टिकवून ठेवणार की पाकिस्तानी संघ आपल्याला मिळालेल्या मौक्यावर चौक मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.