India Vs New Zealand 3rd T20: रोहित शर्मा याने शेवटच्या 2 चेंडूवर मारलेल्या षटकारांमुळे भारताचा रोमांचक विजय; पाहा व्हिडिओ
या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. भारतीय संघाने पहिली फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघासमोर 180 धावांचे लक्ष्य दिले होते.
भारत विरूद्ध न्युझीलंड (India Vs NewZealand 3rd T20) यांच्यात पार पडलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने रोमांचक विजय मिळवला आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. भारतीय संघाने पहिली फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघासमोर 180 धावांचे लक्ष्य दिले होते. तसेच 180 धावांचा पाठलाग करत न्यूझीलंडचा संघ केवळ 179 धावापर्यंत मजल मारू शकला. यानंतर दोन्ही संघात सुपर ओव्हर खेळण्यात आली. दरम्यान, सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) तडाखेबाज फलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवला. परंतु, भारताच्या विजया पेक्षा या समान्यात रोहित शर्माने शेवटच्या 2 चेंडूत मारलेल्या षटकारांचा व्हिडिओ अधिक व्हायरल होत आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 5 टी-20 मालिकेच्या सामन्यात भारताने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घातली आहे. या भारताने दिलेल्या 180 लक्ष्याचे पाठलाग करत न्यूझीलंडचा संघ 179 धावा करु शकला. यामुळे सुपर ओव्हर खेळण्यात आली होती. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघासमोर 18 धावांचे लक्ष्य दिले. त्यानंतर या धावांचे पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि के एल राहुल मैदानात उतरले होते. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला शेवटच्या 2 चेंडूत 10 धावांची गरज होती. त्यावेळी रोहित शर्मा जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत शेवटच्या दोन्ही चेंडूत दोन षटकार लगावून भारतीय चाहत्यांच्या आनंदात भर टाकली. यामुळे सोशल मीडियावर रोहित शर्माच्या कामगिरीचे अधिक कौतूक होत आहे. हे देखील वाचा- IND vs NZ 3rd T20I: थरारक सुपर ओव्हर सामन्यात न्यूझीलंड पुन्हा पराभूत, टीम इंडियाने किवी देशात पहिल्यांदा जिंकली टी-20 मालिका
ट्वीट-
या विजयासह भारताने 5 सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली. तसेच न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. रोहितने 15 आणि राहुलने 5 धावा केल्या. रोहितने अखेरच्या दोन चेंडूंमध्ये 2 षटकार मारत टीम इंडियाला थरारक विजय मिळवून दिला. यावर्षी न्यूझीलंड तिसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळला. यापूर्वी, इंग्लंडविरुद्ध विश्वचषक फायनल आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्याच प्रतिस्पर्धीविरुद्ध पाचव्या टी-20 सामन्यात सुपर ओव्हर खेळली गेली होती. या दोन्हीमध्ये किवी संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आणि यंदाही परिणाम सारखाच राहिला आणि न्यूझीलंडला तिसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.