IND vs NZ, World Cup Semi-Final 2019: टीम इंडियाच्या पराभवाने पाकिस्तानी खूश, खेळाडूंना ट्विटरवर केले ट्रोल

पण पाकिस्तानी चाहते भारतीय फलंदाजांच्या निराशाजनक खेळीला निशाणा बनवत भारतीय क्रिकेटपटूंना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

यंदाच्या आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकचा प्रबळ दावेदार समजल्या गेलेल्या भारतीय संघाला (Indian Team) सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड (New Zealand) कडून 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. किवी गोलंदाजांनी सुरुवातीपासून भारतीय खेळाडूंवर आपले वर्चस्व बनवून ठेवले होते. भारताचे तिन्ही आघाडीचे फलंदाज- रोहित शर्मा, विराट कोहली आणि के एल राहुल प्रत्येक 1 धाव करत बाद झाले. एम एस धोनी (MS Dhoni) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांना वगळता अन्य कोणत्याही खेळाडूला चांगले प्रदर्शन करता आले नाही. न्यूझीलंडविरुद्ध या पराभवासह तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्न अपूर्ण राहिले. (Ind vs NZ Semi Final 2019: भारताच्या पराभवावर पीएम मोदी यांनी व्यक्त केली निराशा, तर राहुल गांधी यांच्या मते संघ ठरला प्रेमास पात्र)

भारताच्या या पराभवामुळे चाहते भरपूर निराश झाले आहेत. पण पाकिस्तानी (Pakistan) चाहते मात्र या संधीचा पूर्ण उपयोग करून घेत आहे. न्यूझीलंडविरुद्ध निराशाजनक खेळीला निशाणा बनवत पाकिस्तानी चाहत्यांनी भारतीय क्रिकेटपटूंना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी चाहत्यांकडून अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

खरंतर मी भारताच्या पराभवाची प्रार्थना केली होती

भारतीय कर्णधार विराट कोहलीचा फोटो वेगवेगळ्या कॅप्शनने शेअर केला जात आहे

दरम्यान, पराभवानंतर कर्णधार कोहलीने संघाचे कौतुक केले. विराट म्हणाला, "भारत फक्त 45 मिनीटांच्या खेळीमुळं हरला". त्याशिवाय, कोहली जडेजा आणि धोनीच्या खेळीचे कौतुक करत म्हणाला, "वाईट वाटत आहे. जेव्हा तुम्ही संपुर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करता आणि शेवटच्या 5 मिनिटांत तुम्ही स्पर्धेबाहेर होता".