India Vs New Zealand Womens Cricket: 'स्मृती मंधाना'ची शतकी खेळी; भारतीय महिला संघाचा दमदार विजय
न्युझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने न्युझीलंडवर 9 विकेट्सने मात केली.
India vs New Zealand Womens Cricket: न्युझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने न्युझीलंडवर 9 विकेट्सने मात केली. भारताच्या स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि जेम्मीह रोड्रीगेज (Jemimah Rodrigues) ही सलामी जोडीने दमदार फलंदाजीच्या जोरावर हा विजय साध्य केला. यात स्मृती मंधाना हीचे दमदार शतक लक्षवेधी ठरले. भारतीय गोलंदाजांनी न्युझीलंडचा 192 धावात धुव्वा उडवला. एकता बिष्ट (Ekta Bisht) आणि पूनम यादव (Poonam Yadav) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेण्यात यश आले. (एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी सलामी, न्युझिलंडवर 8 विकेटनी मात)
न्युझीलंडच्या सुजी बेट्स आणि सोफी डेविने यांनी अनुक्रमे 36 आणि 28 धावांचे योगदान दिले. पहिल्या विकेटसाठी भारतीय संघाला 61 धावांची वाट पाहावी लागली. धावा काढण्याच्या प्रयत्नात ही भागीदारी तुटली आणि हेच भारताच्या पथ्यावर पडले. यानंतर न्युझीलंड संघाने पटापट विकेट्स गमावल्या आणि 192 धावांत त्यांना डाव गुंडाळावा लागला.
स्मृती मंधानाच्या शतकी खेळीमुळे विजयाला गवसणी घालणे अधिक सोपे झाले.