India vs New Zealand 3rd Test 2024 Day 2 Preview: भारतीय फलंदाज मुंबईत दिवस गाजवतील की न्यूझीलंडचे गोलंदाज आपले वर्चस्व राखणार, दुसऱ्या दिवसाच्या खेळापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, मिनी लढाई आणि लाईव्ह स्ट्रिमींगसह सर्व तपशील घ्या जाणून

प्रथम न्यूझीलंडचा संघ 235 धावांवरच आटोपला. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने 82 आणि विल यंगने 71 धावा केल्या.

IND vs NZ (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 3rd Test Match Day 2 Preview:   भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series)  तिसरा सामना 1 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील (Mumbai)  वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सकाळी 9.30 वाजता होणार आहे. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने टीम इंडियाचा (Team India) 113 धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंडने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. यासह न्यूझीलंड (New Zealand)  संघाने नवा इतिहास रचला आहे. न्यूझीलंड संघाने प्रथमच भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकली आहे. टीम इंडियाला तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडचा पराभव करून आपली इज्जत वाचवायची आहे. तर, न्यूझीलंडचा संघ क्लीन स्वीपच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावर आहे. तर न्यूझीलंडचे नेतृत्व टॉम लॅथम (Tom Latham) करत आहे.  (हेही वाचा  -  IND vs NZ 3rd Test Day 1 Stumps: वानखेडेवर पहिल्याच दिवशी 14 विकेट पडल्या, सामन्यावर फिरकीपटूंचे वर्चस्व; रोहित-विराट पुन्हा फ्लॉप )

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण 14 विकेट पडल्या. प्रथम न्यूझीलंडचा संघ 235 धावांवरच आटोपला. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने 82 आणि विल यंगने 71 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने 5 आणि वॉशिंग्टन सुंदरने 4 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट गमावून 86 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा 18 धावा करून बाद झाला तर विराट कोहली 04 धावा करून बाद झाला. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने दोन बळी घेतले.

हेड टू हेड रेकाॅर्ड

भारत आणि न्यूझीलंडचे संघ कसोटीत एकूण 64 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये भारताने 22 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 15 सामने जिंकले आहेत. याशिवाय 27 सामने अनिर्णित राहिले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात खेळताना भारताने 17 कसोटी जिंकल्या आहेत.

खेळपट्टीचा अहवाल (IND vs NZ Pitch Report)

पुण्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारत मुंबईची खेळपट्टी साधारणपणे त्याच्या उसळीसाठी ओळखली जाते. जिथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. जसजसा सामना पुढे जाईल तसतसे फिरकीपटू वर्चस्व गाजवताना दिसतील.

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या कसोटी सामन्यातील प्रमुख खेळाडू (Key Players):

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, टॉम लॅथम (कर्णधार), एजाज पटेल, विल्यम ओ'रुर्के हे असे काही खेळाडू आहेत ज्यांना सामना कसा एकहाती बदलायचा हे माहित आहे.

 सामना कधी सुरु होणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवसाचा खेळ हा 2 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता खेळवला जाईल.

कुठे पाहणार सामना?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स18 आणि कलर्स सिनेप्लेक्स चॅनेलवर उपलब्ध असेल. तर लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर उपलब्ध असेल. याशिवाय, लेटेस्टलीच्या वेबसाइटवर सामन्याबद्दल अपडेट वेळोवेळी मिळत राहिल.