India vs New Zealand 3rd T20I: 'महेंद्रसिंग धोनी'च्या देशप्रेमाचे मैदानावरच दर्शन (Viral Video)
न्युझीलंडविरुद्ध रंगलेल्या अखेरच्या T20 सामन्यात भारताचा 'कूल कॅप्टन' महेंद्रसिंग धोनी याचे एक खास रुप पाहायला मिळाले.
न्युझीलंडविरुद्ध रंगलेल्या अखेरच्या T20 सामन्यात भारताचा माजी 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याचे एक खास रुप पाहायला मिळाले. सामना सुरु असताना अचानक एक चाहता मैदानात आला. त्याच्या हातात तिरंगा होता. हातात तिरंगा पकडत तो धोनीच्या पाया पडू लागला. त्यावर माहीने सर्वप्रथम त्याच्या हातातील तिरंगा वर उचलला. तिरंगा आपल्या पायाशी जावू नये, हा धोनीची विचार आणि त्यातून घडलेली कृती त्याच्या मनातील देशप्रेमाचे दर्शन घडवते. धोनीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात भलताच व्हायरल होत आहे. देशप्रेमापोटी धोनीकडून घडलेल्या या उत्फुर्त कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तिसऱ्या T20 सामन्यात भारत 4 धावांनी पराभूत; न्युझीलंड संघाचा मालिका विजय
न्युझीलंड T20 मालिकेत अखेरच्या निर्णायक सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. अवघ्या 4 धावांनी न्युझीलंडने सामना जिंकत मालिका आपल्या नावे केली.