India Vs New Zealand 3rd ODI: भारताचा न्युझीलंडवर 7 विकेट्सनी दणदणीत विजय, मालिकेत 3-0 चं वर्चस्व
5 सामन्यांच्या मालिकेमध्ये आज न्युझीलंडविरुद्ध माऊंट मॉनगनुई येथील बे ओव्हल (Bay Oval) हा तिसरा सामना जिंकत भारताने मालिकेवर 3-0 वर्चस्व मिळवलं आहे
India Vs New Zealand 3rd ODI 2019: ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर न्युझिलंडमध्ये पोहचलेल्या भारतीय संघाने येथेही विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये आज न्युझीलंडविरुद्ध माऊंट मॉनगनुई येथील बे ओव्हल (Bay Oval) हा तिसरा सामना जिंकत भारताने मालिकेवर 3-0 वर्चस्व मिळवलं आहे. भारताने न्युझिलंडवर 7 विकेट्सने मात केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. मोहम्मद शमी (Mohammed Shami)या सामन्यामध्ये 'मॅन ऑफ द मॅच' ठरला आहे. शमीने या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या आहेत.
सामन्यामध्ये विराट कोहलीने 60 आणि रोहित शर्मा 62 धावा केल्या आहेत. न्युझिलंड संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. तिसर्या सामन्यातही डळमळीत सुरूवात झालेल्या न्युझिलंड संघाने भारतासमोर 244 धावांचं लक्ष्य ठेवलं होत. भारतीय संघाने हा टप्पा सहज पार केला. या सामन्यात मोहम्मद शमीला तीन विकेट्स घेण्यात यश आले. तर युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 2-2 विकेट् घेतल्या. India Vs New Zealand 3rd ODI: कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या फिरकीची कमाल; 100 विकेट्सचा विक्रम
पाच सामन्यांच्या या मालिकेमध्ये भाराताने विजय मिळवल्यानंतर आता उर्वरित दोन सामने आणि टी-20 च्या सामन्यांमध्ये विराट कोहलीला आराम देण्यात आला आहे. पुढील सामन्यांमध्ये रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्त्व करणार आहे.