IND vs NZ 1st Test Day 2 Highlights: न्यूझीलंडने दुसऱ्या दिवशी 5 विकेट गमावून भारतावर घेतली 51 धावांची आघाडी

वेलिंग्टन कसोटीत भारतीय संघ अडचणीत सापडलेला दिसत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 5 विकेट गमावून 122 अशी होती. दिवसाखेर उपकर्णधार अजिंक्य रहाणे 38 आणि रिषभ पंत 10 धावांवर फलंदाजी करीत होते.

22 Feb, 17:22 (IST)

खराब प्रकाशामुळे थांबवण्यात आलेल्या दुसर्‍या दिवसाच्या सामन्यात न्यूझीलंडने 51 धावांनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा किवी कर्णधार केन विल्यमसन 89 आणि रॉस टेलर 44 धावा करून आऊट झाले. बीजे वॅटलिंग आणि कॉलिन डी ग्रैंडहोम अनुक्रमे नाबाद 14 आणि 4 धावा करून खेळत आहेत. दिवसाखेर किवी संघाने 5 विकेट गमावून 216 धावा केल्या. इशांतऐवजी दुसऱ्या दिवशी रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.  शमीला किवी कर्णधाराची महत्तवपूर्ण विकेट मिळाली. 

22 Feb, 17:05 (IST)

रविचंद्र अश्विनने भारताला पाचवी विकेट मिळवून दिली. 17 धावा करून खेळणाऱ्या हेन्री निकोल्स ला अश्विनने कॅप्टन विराट कोहलीकडे कॅच आऊट केले. न्यूझीलंडने 207 धावांवर पाचवी विकेट गमावली. 

22 Feb, 16:44 (IST)

किवी कर्णधार केन विल्यमसन 89 आणि रॉस टेलर 44 धावा करून आऊट झाले. विल्यमसनने 93 चेंडूंत 6 चौकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताविरुद्धचे हे त्याने 17 वे कसोटी अर्धशतक आहे. या अर्धशतकाच्या जोरावर त्याने रॉस टेलरच्या भारताविरुद्ध सर्वाधिक 17 अर्धशतकांची बरोबरी केली आहे. 

22 Feb, 16:37 (IST)

न्यूझीलंडने 4 गडी गमावून 185 धावा केल्या. मोहम्मद शमीने किवी कर्णधार केन विल्यमसनला आऊट करत भारताला मोठे यश मिळवून दिले. विल्यमसन भारतासाठी धोकादायक वाटत होता.विल्यमसनने 89 धावा केल्या. 

22 Feb, 15:47 (IST)

इशांत शर्माने भारताला महत्वाची विकेट मिळवून दिली. 53 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर इशांतने 100 वा टेस्ट सामना खेळणाऱ्या रॉस टेलरला 44 धावांवर चेतेश्वर पुजाराकडे कॅच आऊट केले. 

22 Feb, 15:25 (IST)

इशांत शर्मा भारताला सुरुवातील दोन यश मिळवून दिले. पण त्यानंतर कोणत्याही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही. गोलंदाज विकेट घेण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान किवी कर्णधार केन विल्यमसन टेस्ट करिअरमधील 32 वे अर्धशतक ठोकले. लियामसनने 93 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने रॉस टेलरबरोबर तिसर्‍या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली.

22 Feb, 15:00 (IST)

भारताला पहिल्या डावात 165 धावांवर ऑलआऊट केल्यावर यजमान न्यूझीलंड टीम सध्या 34 धावांनी पिछाडीवर आहे. या दरम्यान, किवी कर्णधार केन विल्यमसनने टेस्ट कारकिर्दीतील 32 वे अर्धशतक पूर्ण केले. विल्यमसनसह रॉस टेलर 27 धावा करून खेळत आहे. विल्यमसन आणि टेलरमध्ये तिसऱ्या विकेटसाठी धावांची भागीदारीही पूर्ण झाली आहे. 

22 Feb, 14:35 (IST)

टीम इंडियाविरुद्ध कसोटीच्या दुसर्‍या दिवशी न्यूझीलंडच्या पहिल्या डावात केन विल्यमसन आणि रॉस टेलर क्रीजवर आहे. टेलरचा हा 100 वा सामना आहे. वेलिंग्टनमध्ये चहाची वेळ झाली असून न्यूझीलंडने 2 विकेट्स गमावून 116 धावा केल्या आहेत.विल्यमसन 46 आणि रॉस टेलर 22 धावा करून खेळत आहेत. 

22 Feb, 14:21 (IST)

यजमान न्यूझीलंडने दोन विकेट गमावून 34.2 षटकांत 102 धावा पूर्ण केल्या आहेत. कर्णधार केन विल्यमसन संघासाठी 42 धावा खेळत असून मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज रॉस टेलर 18 धावांवर आहे.

22 Feb, 13:40 (IST)

इशांत शर्माने भारताला दुसरे यश मिळवून दिले. इशांतने 27 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर टॉम ब्लंडेलला बोल्ड केले.ब्लंडेलने 80 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. 

22 Feb, 13:20 (IST)

भारताला 165 धावांवर ऑलआऊट केल्यावर पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड संघाला सुरुवातीला मोठा झटका बसल्यावर कर्णधार केन विल्यमसन आणि सलामी फलंदाज टॉम ब्लंडेल यांनी डाव सावरला. 22 ओव्हरनंतर किवी टीमने 62 धावा केल्या. विल्यमसन 21 आणि ब्लंडेल 30 धावा करून खेळत आहे. किवी टीम भारताच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात 105 धावांनी मागे आहे. 

22 Feb, 12:23 (IST)

दुपारच्या जेवणानंतरच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये इशांत शर्माने भारताला पहिले यश मिळवून दिले. इशांतने किवी सलामी फलंदाज टॉम लाथमला विकेटकीपर रिषभ पंतकडे कॅच आऊट केले. लाथम 11 धावा करून बाद झाला. 

22 Feb, 12:20 (IST)

दुपारच्या जेवणानंतरच खेळ सुरु झाला आहे. टॉम ब्लंडेल आणि लॅथम ने न्यूझीलंडकडून डावाची सुरुवात केली. फोघांनी 10 ओव्हरमध्ये 26 धावा केल्या. टॉम ब्लंडेल 15आणि लॅथम 11 करून खेळत आहेत. यापूर्वी, किवी टीमने भारताला पहिल्या डावात फक्त 165 धावांवर ऑलआऊट केले. 

22 Feb, 11:35 (IST)

वेलिंग्टनमध्ये सुरु असलेल्या भारत-न्यूझीलंडमधील पहिल्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. पहिल्या दिवशी टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करणाऱ्या किवी टीमने लंच पूर्वीच टीम इंडियाला 165 धावांवर ऑलआऊट केले. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 46 धावा केल्या. लंचच्या वेळेपर्यंत न्यूझीलंडकडून टॉम लाथम आणि टॉम ब्लंडेल यांनी डावाची सुरुवात केली आणि एकही विकेट न गमावता ओव्हरमध्ये 17 धावा केल्या. न्यूझीलंड लंच पर्यंत भारताच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात अजून 148 धावांनी पिछाडीवर आहे. 

22 Feb, 11:07 (IST)

न्यूझीलंडकडून टॉम लाथम आणि टॉम ब्लंडेलने डावाची सुरुवात केली. जसप्रीत बुमराहने भारताकडून नव्या चेंडूवर गोलंदाजी करण्यास सुरवात केली आणि पहिल्याच षटकात तीन धावा दिल्या. 

22 Feb, 10:41 (IST)

भारत आणि न्यूझीलंडमधील पहिली कसोटी वेलिंग्टनमध्ये खेळली जात आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. टॉस जिंकून न्यूझीलंडने पहिल्या दिवशी गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रा आधीच भारताला ऑलआऊट केले.  पहिल्याच दिवशी भारतीय संघाने 5 गडी गमावून 122 धावा केल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी टीम इंडिया धावांवर 165 ऑलआऊट झाली. रहाणेने सर्वाधिक 46 धावा केल्या. या शिवाय, मयंक अग्रवाल 34, पृथ्वी शॉ 16 आणि पंतने 19 धावांचे योगदान दिले. काईल जैमीसन-टिम साऊथी यांनी प्रत्येकी 4 आणि ट्रेंट बोल्ट यांनी 1 गडी बाद केला. 

22 Feb, 10:15 (IST)

न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजांसमोर सावध फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेनेही आपली विकेट गमावली. 46 धावांवर टिम साऊदीने रहाणेला विकेटकिपर बीजे वॅटलिंगकडे झेलबाद केले.

22 Feb, 10:06 (IST)

टीम इंडियाच्या टेस्ट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ने न्यूझीलंडविरुद्ध शांत चित्ताने खेळ केला आणि आता तो त्याच्या अर्धशतकाच्या जवळ पोहचला आहे. रहाणे 62 ओव्हरनंतर 46 धावांवर खेळत आहे. 

22 Feb, 09:51 (IST)

टीम साऊथीच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला सलग दोन झटके बसले. रिषभ पंतला एजाज पटेल ने जबरदस्त थ्रो ने रनआऊट केले, त्यानंतर साऊथीने रविचंद्रन अश्विनला बोल्ड केले आणि खाते न उघडता माघारी धाडले. भारताने 132 धावांवर सातवी विकेट गमावली. 

22 Feb, 09:35 (IST)

भारत-न्यूझीलंडमधील पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. किवी टीमकडून एजाज पटेल ने पहिली ओव्हर टाकली. या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर रिषभ पंत ने जोरदार षटकार मारला. पंत 17 धावा करून खेळत आहे. 

Read more


वेलिंग्टन कसोटीत भारतीय संघ (Indian Team) अडचणीत सापडलेला दिसत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 5 विकेट गमावून 122 अशी होती. दिवसाखेर उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 38 आणि रिषभ पंत (Rishabh Pant) 10 धावांवर फलंदाजी करीत होते. चहाच्या नंतरचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडने (New Zealand) पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्याच सत्रात चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीच्या विकेटसह तीन महत्वपूर्ण विकेट्स घेऊन त्यांनी आपला निर्णय योग्य सिद्ध केला. पहिल्या सत्रात टीम इंडियाला केवळ 43 धावा करता आल्या. आता दुसऱ्या दिवशी टीमला रहाणे आणि पंतकडून मोठ्या अपेक्षा असतील. पहिल्या दिवशी दोन्ही फलंदाज आपली विकेट सांभाळून खेळताना दिसले. दोघांमध्ये चहाच्या वेळेपर्यंत सहाव्या विकेटसाठी 21 धावांची भागीदारी झाली होती.

न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह येथे खेळला जात आहे. संघाची सुरुवात चांगली नव्हती आणि किवी गोलंदाजांसमोर भारताची आघाडीची फळी कोसळली. मयंक अग्रवालने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण तोही 34 धावांवर बाद झाला. कर्णधार कोहलीही स्वस्तात बाद झाला. (सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now