India vs New Zealand 1st Test Day 3 Weather Update Today: तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळात येणार व्यत्यय? जाणून घ्या कसे असेल आजचे बंगळुरूचे हवामान

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने 50 षटकांत तीन गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात 134 धावांची आघाडी घेतली आहे.

Chinnaswamy Stadium, Bengaluru (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs NZ 1st Test 2024) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने 50 षटकांत तीन गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात 134 धावांची आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या दिवशी कसे असेल बंगळुरूचे हवामान

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या बंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा हवामानाचा अंदाज अजिबात चांगला नाही. 18 ऑक्टोबर रोजी हवामान ढगाळ राहील. सध्या सुरू असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी बंगळुरूमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची 27% शक्यता आहे. दिवसभर 100% ढगाळ वातावरण राहील.

हे देखील वाचा: India vs New Zealand 1st Test Stats And Records: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात टीम इंडियाने केल्या फक्त 46 धावा, नको असलेले रेकॉर्ड केले नावावर

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टी.आय.