IPL Auction 2025 Live

India vs New Zealand 1st Test Day 2 Stumps Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, डेव्हन कॉनवेची 91 धावांची तुफान खेळी, न्यूझीलंडच्या 180 धावा; दुसऱ्या दिवसाचे स्कोअरकार्ड पहा

न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात 134 धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 91 धावा केल्या. डेव्हॉन कॉनवेशिवाय विल यंगने 33 धावा केल्या.

New Zealand (Photo: Blackcaps/X)

India vs New Zealand 1st Test Day 2 Stumps Scorecard: 16 ऑक्टोबरपासून भारतीय संघ विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर(M Chinnaswamy Stadium) खेळला जात आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. अखेर सामना रद्द करण्यात आला. या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. तर न्यूझीलंडचे नेतृत्व टॉम लॅथम करत आहे. (हेही वाचा: Rishabh Pant Injured: टीम इंडियाला मोठा धक्का! जडेजाच्या बॉलवर ऋषभ पंत जखमी; गुडघ्याला दुखापत झाल्याने मैदान सोडावे लागले )

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंड संघाने 50 षटकांत तीन गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात 134 धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 91 धावा केल्या. या खेळीदरम्यान डेव्हॉन कॉनवेने 105 चेंडूत 11 चौकार आणि तीन षटकार ठोकले. डेव्हॉन कॉनवेशिवाय विल यंगने 33 धावा केल्या. रचिन रवींद्र नाबाद धावा करत तर डॅरिल मिशेल नाबाद धावा करत खेळत आहे. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दुसऱ्या दिवसाचे स्कोअरकार्ड:

पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून पहिल्या डावात प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या डावात टीम इंडिया 31.2 षटकात केवळ 46 धावांवरच मर्यादित राहिली. टीम इंडियाची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. भारतीय भूमीवर कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. भारतीय संघाचे पाच फलंदाज 0 धावांवर बाद झाले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने एकूण 5 बळी घेतले. तर विल्यम ओ'रुर्कला एकूण 4 विकेट मिळवल्या.