IND vs NZ 1st Test Called Off on Day 1: भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात पावसाचा धुमाकूळ; पहिल्या दिवसाचा खेळ रद्द
IND vs NZ 1st Test Called Off on Day 1: बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीसाठी (IND vs NZ 1st Test) नाणेफेक झाली नाही. पाऊस थांबेल अशी आशा व्यक्त केली गेली. मात्र, तसे काही झले नाही अखेर आजच्या दिवसाचा खेळ थांबवावा लागला आहे. बीसीसीआयने त्याबाबतचे ट्वीट करत माहिती दिली. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जात आहे. दरम्यान, आजच्या दिवसाचा खेळ थांबला आहे. पावसामुळे कालदेखील भारताचा सराव रद्द झाला होता. आता सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा उद्याच्या सामन्यावर आहेत. उद्या भारतीय वेळेनुसार सकाळी 09:15 वाजता सामन्याचा दुसरा दिवस सुरू होईल. अर्धा तास आधी म्हणजे 08:45 वाजता नाणेफेक होईल. उद्याही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.(हेही वाचा:IND vs NZ Test Match Tickets: भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याची तिकिटे सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये; जाणून घ्या किंमत आणि कधीपासून सुरू होणार विक्री? )
पहिल्या दिवसाचा खेळ रद्द
हवामानाचा अंदाज
AccuWeather ने नमूद केले की बंगळुरूमध्ये पावसाचे हवामान आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. कसोटीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी देखील पावसाची शक्यता गेली . बुधवारी पावसाची शक्यता 41 टक्के आहे. परिणामी आज दिवसभर पाऊस सुरू आहे. दुपारनंतर वादळी वारे वाहतील. असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. तेथे 4 दिवस पावसाची शक्यता 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे.
कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 41 टक्के, दुसऱ्या दिवशी 40 टक्के आणि तिसऱ्या दिवशी सर्वाधिक 67 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी, बेंगळुरु कसोटीत चौथ्या दिवशी 25 टक्के आणि पाचव्या दिवशी 40 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.