IND vs BAN 3rd T20I Weather Report: भारताची क्लिन स्वीपची तयारी, तर हैदराबादमध्ये पावसाचे सावट; वाचा अहवामान अहवाल

दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल.

IND vs BAN (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 3rd T20I Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. कसोटीनंतर टीम इंडियाने आता टी-20 मालिकाही नावावर केली आहे.

वाचा हवामान अहवाल (Weather Report)

हवामान खात्यानुसार, भारत-बांगलादेश तिसऱ्या टी-20 दरम्यान हैदराबादमध्ये ढगाळ वातावरण असेल. त्याच वेळी, तापमान 23 अंश ते 26 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता 23 टक्के आहे, पण सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. याशिवाय वाऱ्याचा वेग ताशी 24 किलोमीटर आणि आर्द्रता 89 टक्के राहण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा: India vs Bangladesh, 3rd T20I Key Players: तिसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशला क्लीन स्वीप देण्यास भारत सज्ज; सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11

टीम इंडिया: संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग/तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव/हर्षित राणा.

बांगलादेश : लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), परवेझ हुसेन आमोन, तौहीद ह्रदोय, महमुदुल्ला, जेकर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तंजीम हसन साकीब, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.