Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा टी-20 सामना (IND vs BAN 3rd T20I) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाने यापूर्वीच अजेय आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडिया युवा खेळाडूंना संधी देऊ शकते, अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर हा सामना बांगलादेशचा दिग्गज खेळाडू महमुदुल्लाहच्या टी-20 कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. दुसऱ्या टी-20 पूर्वीच त्याने भारताविरुद्धच्या मालिकेनंतर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले होते. (हे देखील वाचा: India vs Bangladesh 3rd T20I: हैदराबादमध्ये बांगलादेशचा होणार क्लीन स्वीप! आकडेवारी 100% देत आहे विजयाची साक्ष, जाणून घ्या रेकॉर्ड)
खेळपट्टीवर कोणाचे असेल वर्चस्व?
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजांना मोठी मदत मिळते. आयपीएल दरम्यान येथे उच्च स्कोअरिंगचे खेळ पाहायला मिळाले. अशा स्थितीत चाहत्यांना तिसऱ्या टी-20 सामन्यात उच्च धावसंख्येचा सामना पाहायला मिळू शकतो. येथे आतापर्यंत फक्त दोन टी-20 सामने खेळले गेले आहेत. दोन्ही सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघालाच विजय मिळाला आहे.
हैदराबादमध्ये कसा आहे भारताचा विक्रम?
भारताने आतापर्यंत हैदराबादमध्ये दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही 6 विकेट्सने जिंकले आहेत. 2019 मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला आणि 2022 मध्ये ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचा पराभव केला. हा विक्रम पाहता टीम इंडियाच्या विजयाची 100 टक्के खात्री आहे. मात्र, विजयी कोण होणार हे सामना संपल्यानंतरच कळेल. या मैदानावरील टी-20 आंतरराष्ट्रीय धावसंख्याही भारताच्या नावावर आहे, जी त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध धावांचा पाठलाग करताना केली. वेस्ट इंडिजच्या 207 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने 209 धावा करत विजय मिळवला.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
जितेश शर्मा (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन
परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदयॉय, महमुदुल्लाह, मेहदी हसन मिराज, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन शकीब, मुस्तफिजुर रहमान.