India vs Australia T20I: विशाखापट्टणम येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज पहिला सामना, टॉस जिकंत ऑस्ट्रेलिया संघाने निवडलं क्षेत्ररक्षण

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान 2 T 20I आणि पाच एकदिवसीय सामने रंगणार आहेत.

IndVsAUS T20I (Photo Credit: Twitter)

India vs Australia 1st T20I: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान आज पहिला टी २० सामना सुरू होत आहे. विशाखापट्टणमच्या (Visakhapatnam) मैदानावर हा सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विश्वचषक पाहता भारतीय संघाला तपासून पाहण्याची संधी म्हणून ही सिरीज पहिली जात आहे. भारताच्या संघामध्ये मुंबईच्या मयंकला संधी देण्यात आली आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ असा-

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, क्रूणाल पांड्या, विजय शंकर, युजवेंद्र चहल, सिद्धार्थ कौल, मयंक मारकंडे, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान 2 T 20I आणि पाच एकदिवसीय सामने रंगणार आहेत.