T20I Squad: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतून रविंद्र जडेजा आऊट, Shardul Thakur इन

नुकती त्याने 161/7 अशी खेळी करत बचावात्मक पवित्र्यात असलेल्या भारताला आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना सुरु असताना डावखुरा खेळाडू असलेल्या रविंद्र जडेजा याच्या डोक्यावर चेंडू आदळला आणि तो दुखापतग्रस्त झाला.

Ravindra Jadeja (Photo Credits: Twitter / ICC)

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतून भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) संघातून काही काळासाठी बाहेर गेल्यानंतर आता त्याची जागा कोण घेणार? याबाबत उत्सुकता होती. परंतू, रविंद्र जडेजा याचे संघाबाहेर जाणे शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याच्या पथ्यावर पडले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी ट्वेंटी (T20I ) सामन्यांच्या मालिकेत जडेजा ऐवजी शार्दुल ठाकूर मैदानात दिसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( (BCCI) ने म्हटले आहे की, रविंद्र जडेजा हा निरिक्षणाखाली असून, लवकरच तो संघात पुनरागमन करेल.

रविंद्र जडेजा हा भारतीय क्रिकेट संघातील एक नेत्रदीपक कामगिरी करणारा खेळाडू म्हणून ओळकला जातो. नुकती त्याने 161/7 अशी खेळी करत बचावात्मक पवित्र्यात असलेल्या भारताला आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना सुरु असताना डावखुरा खेळाडू असलेल्या रविंद्र जडेजा याच्या डोक्यावर चेंडू आदळला आणि तो दुखापतग्रस्त झाला. डोक्याला शीरस्त्रान (Helmet ) असल्याने जडेजा याला गंभीर दुखापत झाली नाही. परंतू, कोणताही धोका न पत्करता त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. टी -२० च्या मालिकेच्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध सलामीच्या दुसऱ्या डावावेळी जडेजासोबतची ही घटना घडली. या वेळी रविंद्र जडेजा आणि यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) मैदानावर होते.

अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रविंद्र जडेजा याने सामना सुरु असताना अखेरच्या दोन षटकांमध्ये 34 धावा ठोकल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ चांगलाच दबावाखाली गेला आणि भारताचे स्थान मजबूत होऊ शकले. जडेजाने 191.30 अशा स्ट्राईक रेटने आपली धावसंख्या उभारली.

रविंद्र जडेजाने या सामन्यात दमदार कामगिरी करत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. त्यामुळे 19 वे षटक सुरु असतानाही त्याने 23 धावा पटकावत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना असमान दाखवले.