India vs Australia 2nd ODI 2019: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकला; प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार
आज मालिकेतील दुसरा सामना नागपूर येथील विदर्भ क्रिकेट संघ (VCA) मैदानावर रंगणार आहे.
India vs Australia 2nd ODI 2019: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला 2 मार्चपासून सुरुवात झाली. आज मालिकेतील दुसरा सामना नागपूर येथील विदर्भ क्रिकेट संघ (VCA) मैदानावर रंगणार आहे. यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय क्रिकेटवीर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
भारताने पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र मालिकेतील आघाडी राखण्यासाठी आजचा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे.
असे असतील दोन्ही संघ:
भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), केदार जाधव, अंबाती रायडू, विजय शंकर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, सिद्धार्थ कौल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया संघ:
एरॉन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडोर्फ, एलेक्स कॅरी, नाथन कल्टर नाइल, पेंट कमिंस, पीटर हँड्सकॉम्ब, उस्मान ख्वाजा, नाथन लॉयन, शॉन मार्श, ग्लॅन मॅक्सेवल, झाए रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टोइनिस, एश्टन टर्नर, एडम जाम्पा.
यापूर्वी झालेल्या T20 मालिकेतील दोन्ही सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिका आपल्या नावे केली होती.