IPL Auction 2025 Live

IND vs AFG 2nd T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात रविवारी खेळवला जाणार दुसरा टी-20 सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील या मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. इंदूरमध्ये होणारा दुसरा टी-20 हा अफगाणिस्तानसाठी लढा किंवा मरो असा सामना असणार आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवार, 11 जानेवारी रोजी मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना रविवारी म्हणजेच 14 जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. आता टीम इंडियाची नजर दुसरा टी-20 सामना जिंकून मालिका जिंकण्यावर असेल. टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील या मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. इंदूरमध्ये होणारा दुसरा टी-20 हा अफगाणिस्तानसाठी लढा किंवा मरो असा सामना असणार आहे.

टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 5 सामने जिंकले आहेत, तर अफगाणिस्तानने एकदाही विजय मिळवला नाही. अफगाणिस्तान संघाला 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असून एका सामन्यात निकाल लागला नाही. इंदूरमध्येही टीम इंडियाचा वरचष्मा दिसत आहे. (हे देखील वाचा: Holkar Stadium Indore Stats: इंदूरमध्ये रंगणार भारत - अफगाणिस्तान यांच्यात दुसरा टी-20 सामना, कसा आहे होळकर स्टेडियमचा विक्रम घ्या जाणून)

खेळपट्टीचा अहवाल

इंदूरच्या होळकर स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी नेहमीच उपयुक्त ठरली आहे. ही खेळपट्टी सपाट आहे आणि चेंडू सहज बॅटवर येतो. अशा परिस्थितीत या मैदानावर खूप धावा केल्या जातात. या मैदानावर खेळल्या गेलेल्या तीन टी-20 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनदा सव्वाशेहून अधिक धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये या मैदानाची सर्वोच्च धावसंख्या 260 आहे.

कुठे पाहणार लाइव्ह

टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स-18 वाहिनीवर केले जाईल. चाहते Jio Cinema अॅपवर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंगही पाहू शकतात.