भारताचा U-19 विश्वचषक हिरो मनजोत कालरा याला 1 वर्षासाठी रणजी ट्रॉफीमध्ये केले निलंबित, जाणून घ्या कारण
डीडीसीएच्या आउटगोइंग लोकपालने वयाच्या 16 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील फसवणूकीच्या आरोपाखाली रणजी ट्रॉफीमधून त्याला एक वर्षासाठी निलंबित केले आहे.
गेल्या अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात शतक ठोकणार्या डावखुरा सलामी फलंदाज मनजोत (Manjot Kalra) कालरा यांना मोठा झटका बसला आहे. डीडीसीएच्या (DDCA) आउटगोइंग लोकपालने वयाच्या 16 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील फसवणूकीच्या आरोपाखाली रणजी ट्रॉफीमधून त्याला एक वर्षासाठी निलंबित केले आहे. मात्र, अशाच एका गुन्ह्यात दिल्लीच्या वरिष्ठ संघाचा उपकर्णधार नितीश राणा (Nitish Rana) याला काही काळासाठी सोडण्यात आले आहे. जुनिअर स्तरावर त्याने फसवणूक केली हे सिद्ध करण्यासाठी अधिक कागदपत्रे मागविण्यात आली आहेत. 19 वर्षांखालील आणखी एक खेळाडू शिवम मावी (Shivam Mavi) याचेही प्रकरण बीसीसीआयकडे पाठविण्यात आली आहेत. ज्येष्ठ क्रिकेटमध्ये तो उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो. निवर्तमान लोकपाल न्यायमूर्ती (निवृत्त) बदर दुरेज अहमद यांनी आपल्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी हा आदेश दिला. त्याने कालरावर दोन वर्ष वयोगटातील क्रिकेट खेळण्यास बंदी घातली आहे, पण महत्त्वाचे म्हणजे या हंगामात त्याला रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेत खेळण्यास मनाई केली गेली आहे.
बीसीसीआयच्या नोंदीनुसार कालरा 20 वर्ष 351 दिवसाचा आहे. मागील आठवड्यात त्याने बंगालविरुद्ध दिल्ली अंडर-23 सामना खेळला होता, त्यामध्ये त्याने 80 धावा केल्या. रणजीमध्ये तो शिखर धवन याची जागा घेण्याच्या स्पर्धेत होता, पण आता त्याला खेळता येणार नाही. मनजोतच्या आई-वडिलांवर त्यांचा मुलगा 1999 मध्ये ज्युनियर क्रिकेट खेळण्यासाठी त्याची जन्मतारीख 1999 सांगण्याचा आरोप होता. त्याची जन्म तारीख 15 जानेवारी 1998 होती पण, त्यांनी 15 जानेवारी 1999 सांगितली. त्यावेळी मनजोत हा अल्पवयीन प्रकारात होता, म्हणून त्याच्या पालकांवर आरोपपत्र दाखल केले गेले. दुसरीकडे, नितीश राणाच्या प्रकरणात लोकपालने डीडीसीएला चौकशी करायला सांगितले आहे. त्यांनी जन्म प्रमाणपत्रांशी संबंधित विशेष कागदपत्रे गोळा करून पुढील सुनावणीत सादर करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, 3 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या पंजाबविरुद्ध मॅचसाठी निवड समितीने धवन आणि इशांत शर्मा यांच्या जागी मध्यम फळीतील फलंदाज वैभव कंदपाल कांडपाल आणि वेगवान गोलंदाज अष्टपैलू सिद्धांत शर्मा यांचा संघात समावेश केला आहे.