India tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; विकेट किपरसाठी पहिली पसंती नाही
शिवाय तो भारतातील किंवा परदेशातील सामन्यासाठी प्रथम निवडलेला विकेटकीपर म्हणून प्रवास करणार नाही.
यंदाच्या आयसीसी (ICC) विश्वचषक स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या खेळीची सर्वत्र टीका केली जात आहे. विश्वचषक संपला पण धोनीवर आरोप आहेत की संपता संपत नाही. चाहते आणि तज्ञ त्याच्या निवृत्तीची मागणी करत आहे. विश्वचषकच्या सेमीफाइनलमधून धक्का दायक पाने बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ पुढील मेहुण्यापासून वेस्ट इंडिज दौर्यावर जाणार आहे. वेस्ट इंडिज (West Indies) दौर्यासाठी देखील धोनीची टीम इंडियामध्ये निवड होणार की नाही यावर शंकाच आहे. पण टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार धोनी टीम इंडिया सह वेस्ट इंडिजला नाही जाणार. धोनीने स्वत: वेस्टइंडीज दौर्यासाठी अनुपलब्ध असल्याचे म्हटले आहे. (एम एस धोनीने स्वतःहून निवृत्तीचा निर्णय घ्यावा, नाहीतर संघाबाहेर बसवू; कॅप्टन कूलला बीसीसीआय ची ताकीद)
धोनीच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात सहभागाबद्दल बोलताना एका बीसीसीआय अधिकारीने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले,"एम एस वेस्टइंडीजला जाणार नाही. पुढे, तो भारतातील किंवा परदेशातील सामन्यासाठी प्रथम निवडलेला विकेटकीपर म्हणून प्रवास करणार नाही. त्याची जागा रिषभ पंत (Rishabh Pant) घेईल. धोनी संघाच्या 15 जणांमध्ये असेल पण तो अंतिम 11 मध्ये नसेल. त्याच्या जागी पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत पंत सेट होत नाही तोपर्यंत धोनी संघात असेल. दरम्यान धोनी संघासोबत राहून पंतला मार्गदर्शन करेल."
दरम्यान, विश्वचषकमध्ये मिळालेल्या पराभवानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले. मात्र, धोनीने स्वतः यावर कोणतेही भाष्य करणे टाळले आहे. विश्वचषकमध्ये धोनीने केलेल्या धिम्या फलंदाजीमुळे निवड समितीचे एम एस के प्रसाद (MSK Prasad) याविषयी लवकरच त्याच्याशी बोलणार आहेत.