IPL Auction 2025 Live

India Tour of Ireland 2022: भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा प्रयोग; VVS Laxman बनू शकतात टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक, राहुल द्रविडची काय असणार भूमिका?

जेव्हा द्रविडने मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार देत होता तेव्हा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने लक्ष्मणशी चर्चा केली, पण Jammie ने सहमती दिल्यानंतर लक्ष्मणकडे एनसीएची जबाबदारी दिली.

राहुल द्रविड व व्हीव्हीस लक्ष्मण (Photo Credit: PTI)

आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघाचे (Indian Team) बरेच सामने होणार आहेत. पहिला दक्षिण आफ्रिका (South Africa) संघ भारत दौऱ्यावर येईल. 9 जून ते 19 जून दरम्यान दोन्ही संघ 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळतील. यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्याला (India Tour of England) रवाना होईल, जिथे ते त्यांची शेवटची कसोटी आणि एकदिवसीय व टी-20 मालिका खेळतील. यादरम्यान भारतीय संघातपुन्हा बदलाचे वारे वाहू लागले आहेत असे दिसत आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी बीसीसीआय (BCCI) आयर्लंडच्या दौऱ्यावर दुसरा संघ पाठवण्याच्या विचारात आहेत, जिथे भारताला दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांची जूनच्या अखेरीस आयर्लंड दौऱ्यासाठी भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. (India Squad SA Series: रोहित शर्माचा ‘यू-टर्न’; दक्षिण आफ्रिका T20 मालिकेत शिखर धवनसह ‘हा’ धाकड अष्टपैलू भारताचे नेतृत्व करण्याचा प्रबळ दावेदार)

भारत आयर्लंडमध्ये दोन T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळतील तेव्हा राहुल द्रविड एक कसोटी आणि 5 टी-20 च्या तयारीची देखरेख करण्यासाठी इंग्लंडमध्ये असतील. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक लक्ष्मण यांच्याकडे आयर्लंडमधील दोन सामन्यांसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सोपवण्यात येईल. या दोन दौऱ्यांमध्ये कोणते खेळाडू भाग घेतात हे पाहणे अद्याप बाकी आहे कारण तिन्ही फॉरमॅट खेळणारे अनेक क्रिकेटपटू 24-27 जून दरम्यान लीसेस्टरविरुद्ध चार दिवसीय सामना खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये असतील. भारत मायदेशात (9 ते 19 जून) दक्षिण आफ्रिका टी-20 आणि त्यानंतर आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी पुढील आठवड्यात संघ जाहीर करण्याची शक्यता आहे. या दोन्ही टी-20 मालिकेसाठी संघातून नियमित कसोटी खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता असून भारतीय कसोटी संघ 15 जून रोजी यूकेला एकदिवसीय कसोटीच्या तयारीसाठी रवाना होऊ शकतो, ज्याने गेल्या वर्षी झालेली 5 कसोटी सामन्यांची मालिका संपुष्टात येईल. भारताच्या शिबिरात कोविड-19 च्या चिंतेमुळे मँचेस्टरमधील अंतिम कसोटी सामना पुढे ढकलण्यापूर्वी भारताने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी बीसीसीआयने दोन वेगवेगळ्या संघांची घोषणा केली होती, भारताचे कसोटी विशेषज्ञ इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तयारी करत असताना शिखर धवनच्या नेतृत्वात युवा भारतीय संघाने श्रीलंकेचा मर्यादित षटकांचा दौरा झाला होता. राहुल द्रविड, जे तत्कालीन NCA प्रमुख होते, त्याने 3 वनडे आणि टी-20 सामन्यांसाठी रवी शास्त्रीच्या जागी मुख्य प्रशिक्षकची भूमिका बजावली होती.