IND VS AUS, Border-Gavaskar Trophy: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा, पाच कसोटी सामन्याची मालिका होणार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 1991-92 मध्ये अखेरची पाच सामन्याची कसोटी मालिका पार पडली होती.
भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा (Australia v India Test schedule) करण्यात आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये होणाऱ्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेची (Border-Gavaskar Trophy) घोषणा करण्यात आली आहे. यावेळीस या कसोटी मालिकेत पाच कसोटी सामने होणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने हा भारताचा दौरा महत्तावाचा असणार आहे. या दौऱ्यामध्ये एका डे नाईट कसोटीचाही समावेश आहे. 22 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. तर 3 जानेवारी रोजी अखेरचा कसोटी सामना पार पडणार आहे. (हेही वाचा - IND Vs AUS Test Series: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या ठिकाणांची घोषणा)
तब्बल 32 वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्याची कसोटी मालिका होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 1991-92 मध्ये अखेरची पाच सामन्याची कसोटी मालिका पार पडली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलिया भारताच्या दौऱ्याबाबत अधिकृत माहिती आणि वेळापत्रक जारी केले आहे.
पाहा पोस्ट -
भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेळापत्रक
22 ते 26 नोव्हेंबर- पहिला कसोटी सामना, पर्थ (दिवसा)
6 ते 10 डिसेंबर- दुसरा कसोटी सामना, अॅडिलेड ओव्हल (दिवस-रात्र)
14 ते 18 डिसेंबर- दिसरा कसोटी सामना, गाबा, ब्रिस्बेन (दिवसा)
26 ते 30 डिसेंबर- चौथा कसोटी सामना, एमसीजी, मेलबर्न (दिवसा)
3 ते 7 जानेवारी- पाचवा कसोटी सामना, सिडनी (दिवसा)
भारतीय संघ 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चार कसोटी सामन्यासाठी गेला होता. ही कसोटी मालिका भारताने 2-1 च्या फरकाने जिंकली होती.