India Tour of Australia 2020-21: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर क्वारंटाइन दरम्यान भारतीय संघाला सराव करण्याची मुभा; सिडनी, कॅनबेरा येथे खेळली जाईल टी-20, वनडे मालिका

इंडियन प्रीमियर लीगमधून परतलेल्या भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंना क्वारंटाइन कालावधी दरम्यान सिडनी येथे प्रशिक्षणाची परवानगी दिली आहे

आरोन फिंच आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

India Tour of Australia 2020-21: न्यू साउथ वेल्स (New South Wales) सरकारने अनिवार्य क्वारंटाइन दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणाऱ्या भारतीय संघाला (Indian Team) प्रशिक्षणाची परवानगी दिली असल्याने सिडनी (Sydney) व कॅनबेरा (Canberra) भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियन दौर्‍यावर व्हाईट बॉल मालिका आयोजित केली जाणार आहे. न्यू साउथ वेल्स सरकार (New South Wales Government) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्या करारानुसार इंडियन प्रीमियर लीगमधून (Indian Premier League) परतलेल्या भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंना क्वारंटाइन कालावधी दरम्यान सिडनी येथे प्रशिक्षणाची परवानगी दिली आहे, अशी माहिती ईएसपीएन किकइन्फोने गुरुवारी दिली. भारतीय संघ प्रथम ब्रिस्बेन येथे पोहोचणार होता, परंतु क्वीन्सलँड राज्य आरोग्य अधिकाऱ्यांनी या काळात विराट कोहली आणि टीमला 14 दिवसांच्या क्वारंटाइन दरम्यान प्रशिक्षणाची परवानगी दिली नाही. ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान भारत तीन आंतरराष्ट्रीय टी-20, तीन एकदिवसीय आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिले दोन वनडे सामने 27 आणि 29 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर होतील आणि त्यानंतर अखेरचा वनडे सामना कॅनबराच्या मानुका ओव्हल येथे खेळला जाईल. (India tour of Australia 2020: ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर 5व्या वेगवान गोलंदाजासाठी मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्यात लढत)

पहिला टी-20 सामना कॅनबेरा येथेही खेळला जाईल, त्यानंतर सिडनीमध्ये शेवटचे दोन टी-20 सामने खेळले जातील. त्यांनतर 17 ते 21 पिंक-बॉल टेस्टने कसोटी मालिकेला सुरुवात होईल. हा अ‍ॅडिलेड येथे खेळला जाईल. शिवाय, कोविड-19 मुळे मेलबर्नच्या अधिकाऱ्यांनी एमसीजीमध्ये सामना खेळण्याची परवानगी दिली नाही तर 26 डिसेंबरपासून होणारी बॉक्सिंग डे टेस्टही अ‍ॅडलेडमध्ये खेळली जाऊ शकते. दरम्यान, भारतीय क्रिकेट बोर्डाच्या मंजुरीनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया पूर्ण वेळापत्रक जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.

सिडनी येथे नवीन वर्षाची कसोटी सामना सात ते 11 जानेवारी पर्यंत वाढविण्यात आला आहे, ज्यानंतर 15 जानेवारीपासून होणार्‍या चौथ्या आणि अंतिम कसोटीसाठी संघ ब्रिस्बेन येथे पोहोचतील. 15 ते 19 जानेवारी रोजी अंतिम टेस्ट सामना खेळला जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif