India Tour of Australia 2020-21: खुशखबर! भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील 'या' सामन्याचे दररोज 25000 चाहते स्टेडियममध्ये लुटू शकणार आनंद, वाचा सविस्तर

26 डिसेंबरपासून एमसीजी ग्राउंडवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना रंगेल.

टिम पेन आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

India Tour of Australia 2020-21:  भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील (Australia Tour of India) दुसर्‍या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) दररोज अधिकारी किमान 25,000 लोकांना आकर्षित करत असल्याचे एका सरकारी अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. 26 डिसेंबरपासून एमसीजी ग्राउंडवर भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामना रंगेल. आयकॉनिक स्टेडियममध्ये एका वेळी 100,000 चाहते जमा होऊ शकतात. ऑस्ट्रेलियातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर, मेलबर्न येथे बुधवारी कोरोना व्हायरस लॉकडाउनमुक्त करण्यात आले आहे. भारतीय संघ 27 नोव्हेंबर ते 19 जानेवारी दरम्यान तीन वनडे, तीन टी-20 आणि चार कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणार आहे. संघटना आणि चाहत्यांना कसोटी सामन्यासाठी स्टेडियममध्ये सुरक्षितपणे उपस्थित राहू शकतील यासाठी व्हिक्टोरियन सरकार, मेलबर्न क्रिकेट क्लब आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) "कोविडसेफ योजना" विकसित करेल. (India Tour Of Australia 2020: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्मा संघाबाहेर तर, IPL मधील 'या' खेळाडूंना संघात स्थान)

IANSमध्ये दिलेल्या वृत्तानुसार एमसीसीचे मुख्य कार्यकारी स्टुअर्ट फॉक्स यांनी सांगितले, “आमच्या नवीन कोविडसेफ प्रोटोकॉल अंतर्गत आम्ही एमसीजी येथे यावर्षीच्या बॉक्सिंग डे कसोटीचे आयोजन करण्यासाठी व्हिक्टोरियन सरकार आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्याशी जवळून काम करत आहोत.” यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख अर्ल एडिंग्ज म्हणाले की, “बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही कसोटी क्रिकेटमधील प्रतिष्ठित ट्रॉफीपैकी एक आहे, आणि जस्टीन लँगरच्या मार्गदर्शनाखालील आणि टीम पेनच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ एका प्रतिभावंत भारतीय संघाविरोधात खेळताना पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.”

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया 17 डिसेंबरपासून अ‍ॅडिलेड येथे गुलाबी-बॉल टेस्टसह बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेची सुरुवात करणार आहे. त्यापाठोपाठ एमसीजी (26 डिसेंबर), सिडनी क्रिकेट ग्राऊंड (7 जानेवारी) आणि गब्बा (15 जानेवारी) येथे कसोटी सामने आयोजित केले जातील. दरम्यान, ऐतिहासिक एमसीजीने पुढील तीन वर्षांसाठी कसोटी क्रिकेट होस्ट केल्याची पुष्टी केली गेली आहे. आयसीसी फ्यूचर टूर्स प्रोग्रामनुसार ऑस्ट्रेलिया 2021 मध्ये इंग्लंड आणि 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सामने आयोजित करेल. एमसीजी येथे पहिली बॉक्सिंग डे कसोटी इंग्लंड विरुद्ध 1950 मध्ये खेळली गेली होती.