बुधवार, ऑगस्ट 19, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
पुण्यात 18-31 ऑगस्टदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू, पाच किंवा अधिक लोकांच्या जमावासाठी पोलिस परवानगी बंधनकारक | Mumbai Local Mega Block Today: सेंट्रल, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर ब्लॉक; अनेक फेर्‍या रद्द | Lalit Modi ने फेटाळलं Bigg Boss 20 मधील सहभागाचे वृत्त; 'खोटी बातमी' हटवण्यासाठी कायदेशीर नोटीस |

England Beat India 1st Test Match: लीड्स कसोटीत भारताचा वाईट पराभव, इंग्लंडचा 5 गडी राखून शानदार विजय; मालिकेत 1-0 घेतली अशी आघाडी

पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा 5 गडी राखून पराभव (England Beat India) केला. यासह इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात भारताने इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाने 5 गडी राखून विजय नावावर केला.

England Beat India 1st Test Match: लीड्स कसोटीत भारताचा वाईट पराभव, इंग्लंडचा 5 गडी राखून शानदार विजय; मालिकेत 1-0 घेतली अशी आघाडी
IND vs ENG (Photo Credit- X)

India National Cricket Team vs England National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test 2025) 20 जून (शुक्रवार) पासून लीड्समधील हेडिंग्ले ग्राउंड्सवर खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा 5 गडी राखून पराभव (England Beat India) केला. यासह इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात भारताने इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या संघाने 5 गडी राखून विजय नावावर केला. (हे देखील वाचा: KL Rahul New Record: केएल राहुलने इंग्लंडमध्ये एक मोठा विक्रम रचला, महान खेळाडूंनाही मागे टाकले)

जयस्वाल, गिल आणि पंतचे दमदार शतक

त्याआधी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने सुरुवात चांगली केली आणि पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी रचली. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 471 धावा केल्या. भारताकडून यशस्वी जयस्वाल (101), कर्णधार शुभमन गिल (147) आणि ऋषभ पंतने (134) शतके झळकावली. तर केएल राहुलने 42 धावांचे योगदान दिले. गिल आणि पंतने मिळून 209 धावांची मोठी भागीदारी रचली. बाकी कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स आणि ब्रायडन कार्सने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या. तर जोश टंग आणि शोएब बशीर यांनी 1-1 विकेट मिळाली.

जसप्रीत बुमराहने घेतल्या पाच विकेट्स

प्रत्युत्तरात, पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडचा संघाने 10 विकेट गमावून 465 धावा केल्या. आणि भारताने 6 धावांची आघाडी घेतली. फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात काही खास झाली नाही. झॅक क्रॉली 4 धावा करुन बुमराहाचा बळी ठरला. पुढे पोप आणि डकेटने 122 धावांची भागीदारी रचली. इंगलंडकडून ऑली पोपने 106 धावा केल्या तर हॅरी ब्रूक 99 बाद झाला. जेमी स्मिथ 40 आणि ख्रिस वोक्स 38 धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने तीन आणि मोहम्मद सिराजने दोन विकेट्स घेतल्या.

ऋषभ पंत आणि केएल राहुलचे शानदार शतक

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात काही खास झाली नाही. जयस्वाल 4, सुदर्शन 30 आणि गिल 8 धावांवर माघारी परतले. त्यानंतर केएल राहुल आणि ऋषभ पंतने डाव सांभाळत 192 धावांची शानदार भागीदारी रचली. केएल राहुल 137 आणि ऋषभ पंतने 118 धावा केल्या आणि भारताचा स्कोर 364 धावांवर पर्यंत पोहचवला. भारताने पहिल्या डावात 6 धावांची आघाडी घेतल्याने इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लडकडून ब्रायडन कार्से आणि जोश टंगनेने प्रत्येतकी 3 विकेट घेतल्या.

 बेन डकेटची 149 धावांची विजय खेळी

त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी 188 धावांची मोठी भागीदारी रचली. क्रॅाली 65 आणि बेन डकेट 149 धावा केल्या. नंतर जो रूट 53 आणि जेमी स्मिथच्या 44 नाबाद खेळीने इंग्लंडला मोठा विजय मिळवून दिला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी 2-2 विकेट घेतल्या, तर रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. या डावात बुमराह आणि सिराज यांना यश मिळाले नाही. इंग्लंडने केवळ 82 षटकांत लक्ष्य गाठले आणि कसोटी इतिहासातील आणखी एक संस्मरणीय विजय नोंदवला. या पराभवासह भारत पाच सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने मागे पडला. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 ते 6 जुलैपासुन एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे दुपारी 3.30 वाजल्यापासून खेळवला जाईल.

(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2025 10:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

Close
Latestly whatsapp channel