India Squad For NZ Series 2021: न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी अनकॅप्ड खेळाडूंना संधीची शक्यता, IPL मधून निवडकर्त्यांना केलेत प्रभावित

सध्या UAE येथे सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या समाप्तीनंतर नवीन टीम इंडिया घरच्या मालिकेत 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडशी भिडणार आहे. सतत खेळत असल्याने यंदाच्या मालिकेसाठी ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटूंना विश्रांती दिली जाऊ शकते असा दावा अहवालात करण्यात आला आहे. अशा स्थितीत त्यांच्या जागी आयपीएलमध्ये ठसा उमटवणाऱ्या युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.

व्यंकटेश अय्यर (Photo Credit: PTI)

India Squad For New Zealand Series 2021: सध्या UAE येथे सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या समाप्तीनंतर नवीन टीम इंडिया (Team India) घरच्या मालिकेत न्यूझीलंडशी  (New Zealand) भिडणार आहे. अनेक कारणांमुळे दोन्ही संघातील ही मालिका चुरशीची असेल. अलीकडच्या काळात आणि मोठ्या स्पर्धांमध्ये केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वातील संघाने भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. 2019 चा एकदिवसीय वर्ल्ड कप असो किंवा जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि टी-20 विश्वचषक किवी खेळाडूंनी भारतावर वर्चस्व गाजवून त्यांचा खेळ खराब केलेला आहे. 17 नोव्हेंबरपासून मालिका सुरु होणार असून लवकरच भारतीय संघाची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. (IND vs NZ 2021 Series: भारताविरुद्ध कसोटी मालिकेत भिडण्यासाठी न्यूझीलंड संघ जाहीर, किवी संघाच्या WTC फायनलचे 2 हिरो सिरीजमधून OUT)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून सतत खेळत असल्याने यंदाच्या मालिकेसाठी ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटूंना विश्रांती दिली जाऊ शकते असा दावा अहवालात करण्यात आला आहे. अशा स्थितीत त्यांच्या जागी आयपीएलमध्ये ठसा उमटवणाऱ्या युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. हे आहेत 5 आयपीएल स्टार्स ज्यांना न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघात संधी मिळू शकते

1. व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer)

मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या या युवा अष्टपैलू खेळाडूने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. अय्यरने येताच बड्या गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करून चाहते व निवडकर्त्यांना प्रभावित केले. या संपूर्ण स्पर्धेत त्याने एकूण 10 सामने खेळले आणि 41.11 च्या सरासरीने 370 धावा केल्या. यादरम्यान अय्यरने 4 अर्धशतकेही झळकावली. गोलंदाजीतही त्याने हात आजमावला आणि 3 विकेट घेतल्या. केकेआरला अंतिम फेरीत नेण्यात अय्यरचा मोठा वाटा होता. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याला टी-20 विश्वचषकासाठी नेट-प्लेअर म्हणून भारतीय संघातही सामील करण्यात आले होते. आणि आता असे मानले जात आहे की न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

2. हर्षल पटेल (Harshal Patel)

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात हर्षल पटेलच्या चेंडूंवर धावा काढणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे ठरले नाही. आरसीबीचा हा वेगवान गोलंदाज यापूर्वीही आयपीएलमध्ये सहभागी झाला होता, मात्र त्याचे खरे रंग या मोसमात पाहायला मिळाले. त्याने या मोसमात 15 सामन्यांत 32 विकेट्स घेत पर्पल कॅप पटकावली. आता हर्षलची ही अप्रतिम कामगिरी पाहून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत (ind vs nz) त्याचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो असे मानले जात आहे.

3. रुतुराज गायकवाड (Ruturaj Gayakwad)

चेन्नईच्या विक्रमी चौथ्या आयपीएल जेतेपदात फाफ डू प्लेसिस आणि रुतुराज गायकवाड यांनी मोलाचे योगदान दिले. गायकवाडने या स्पर्धेत सर्वाधिक 635 धावा केल्या आणि ऑरेंज कॅप पटकावली. यादरम्यान त्याने एक शतकही झळकावले. त्याला श्रीलंका दौऱ्यावर मालिकेसाठी भारतीय संघातही संधी देण्यात आली होती. पण तिथे त्याला विशेष कमाल करता आली नाही. पण या मोसमातील त्याची वेगवान फलंदाजी पाहून तो पुन्हा एकदा न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत भारतीय संघात स्थान मिळवू शकतो असे दिसत आहे.

4. आवेश खान (Avesh Khan)

दिल्ली कॅपिटल्सचा युवा वेगवान गोलंदाज आवेश खानने संपूर्ण आयपीएल हंगामात आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. या संपूर्ण मोसमात 22 वर्षीय युवा स्टार वेगवान गोलंदाजाने एकूण 24 विकेट घेतल्या. BCCI ने आवेशला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे फळ दिले आणि T20 विश्वचषकसाठी नेट-बॉलर म्हणून भारतीय संघात त्याचा समावेश केला. आता न्यूझीलंडसोबत आगामी मालिकेत (ind vs nz) त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

5. रवि बिष्णोई (Ravi Vishnoi)

अंडर 19 क्रिकेटमध्ये धमाल केल्यानंतर रवि विश्नोईने आयपीएलमध्येही आपल्या लेग स्पिनच्या जादूने मोठ्या दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. राजस्थानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या या युवा लेग-स्पिनरला पंजाब किंग्जने सुरुवातीला विशेष संधी दिली नाही, पण जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने आपल्या संघासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. IPL 2021 मध्ये रवीने 9 सामन्यात एकूण 12 विकेट घेतल्या. यादरम्यान त्याची सरासरी 18.50 इतकी होती आणि इकॉनॉमी रेट 6.34 राहिला. जो टी-20 क्रिकेटच्या दृष्टीने खूप चांगला आहे. त्याच्या या चमकदार कामगिरीनंतर न्यूझीलंडविरुद्ध आगामी मालिकेत विश्नोईला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते असे मानले जात आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now