India vs Bangladesh 1st Test Day 3 Live Score Update: भारताने बांगलादेशसमोर ठेवले 515 धावांचे लक्ष्य, दुसरा डाव 287/4 धावांवर घोषित; पंत-गिलचे दमदार शतक

यासह भारताने बांगलादेशसमोर विजयसाठी 515 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Rishabh Pant And Shubman Gill (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 23 षटकांत तीन गडी गमावून 81 धावा केल्या होत्या. दरम्यान, तिसऱ्या दिवशी भारताने दुसरा डाव चार विकेट गमावून 287 धावांवर घोषित केला आहे. यासह भारताने बांगलादेशसमोर विजयसाठी 515  धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

पंत-गिलचे दमदार शतक

भारताकडून शुभमन गिलने 176 चेंडूंत 10 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 119 धावा केल्या. तर, केएल राहुल 22 धावा करून नाबाद राहिला. ऋषभ पंतने 109 धावांची खेळी केली. पंत आणि गिल यांनी चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली. यापूर्वी यशस्वी जयस्वाल (10), रोहित शर्मा (5) आणि विराट कोहली (17) शुक्रवारीच बाद झाले. भारताने आज 81/3 धावसंख्येवरून खेळण्यास सुरुवात केली आणि 206 धावांची भर घालून डाव घोषित केला. (हे देखील वाचा: Rishabh Pant Setting Bangladesh Field: चेन्नई कसोटीत ऋषभ पंतने बांगलादेशची फिल्डिंग केली सेट, व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू)

भारताकडून रविचंद्रन अश्विनने झळकावले शतक

त्याआधी बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी साठी आलेला भारताचा पहिला डाव 376 धावांवर संपुष्टात आला. भारतासाठी रविचंद्रन अश्विनने 113 धावांची दमदार खेळी केली, रवींद्र जडेजाने 86 धावा आणि यशस्वी जैस्वालने 56 धावा केल्या. बांगलादेशकडून हसन महमूदने सलामी दिली तर तस्किन अहमदनं 3 बळी घेतले.

बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांवर गारद

याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली आहे. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात केवळ 149 धावा करू शकला. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4, सिराज-जडेजा आणि आकाश दीपने 2-2 विकेट घेतल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 32 धावा केल्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif