IND vs AUS 1st Test 2024 Day 1 Scorecard: कांगारुच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचा पहिला डाव 150 धावांवर ढेपाळला, हेझलवूडने घेतले 4 बळी; नितीश रेड्डीने केल्या 41 धावा

भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून हर्षित आणि नितीश कुमार रेड्डी यांनी कसोटी पदार्पण केले आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला.

IND vs AUS 1st Test 2024 Day 1 Scorecard: कांगारुच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचा पहिला डाव 150 धावांवर ढेपाळला, हेझलवूडने घेतले 4 बळी; नितीश रेड्डीने केल्या 41 धावा
IND vs AUS (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Australia Men's Cricket Team: भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे. भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून हर्षित आणि नितीश कुमार रेड्डी यांनी कसोटी पदार्पण केले आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला.

भारतीय फलंदाज फ्लाॅप

प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी आले मात्र त्यांना विशेष काही करता आले नाही. तिसऱ्याच षटकात मिचेल स्टार्कने यशस्वी जैस्वालच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. जैस्वाला खातेही उघडता आले नाही. यानंतर देवदत्त पडिक्कलही शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीही काही विशेष करू शकला नाही आणि केवळ 5 धावा करून जोश हेझलवूडचा बळी ठरला. या वेळी केएल राहुलने (KL Rahul) एक टोक धरले आणि हळूहळू संघाच्या खात्यात धावांची भर घातली पण तोही 26 धावा करुन बाद झाला.

हे देखील वाचा: KL Rahul Out or Not Out: केएल राहुलसोबत झाली चीटिंग? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे पर्थ कसोटीत चर्चेला उधाण

जोश हेझलवूडने घेतल्या 4 विकेट

लंच ब्रेकनंतर मिचेल मार्शने ध्रुव जुरेल (11) आणि वॉशिंग्टन सुंदर (4) यांना आपला बळी बनवले. 37 धावा करू शकणाऱ्या पॅट कमिन्सने पंतची मौल्यवान विकेट घेतली. यानंतर हर्षित राणा 7 धावा करून बाद झाला तर कर्णधार जसप्रीत बुमराह 8 धावा करून बाद झाला. भारताला शेवटचा धक्का नितीश राणाच्या रूपाने बसला. तो 41 धावा करुन बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने 4 विकेट घेतल्या. तसेच, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्श यांनी 2-2 विकेट घेतल्या.

(The above story first appeared on LatestLY on Nov 22, 2024 12:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).