India Beat Bangladesh 1st Test: चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा उडवला 280 धावांनी धुव्वा, विजयाचे ठरले 'हे' सर्वात तीन मोठे कारण

भारतीय संघाच्या विजयाचा हिरो आर अश्विन ठरला.

Team India (Photo Credit - X)

IND vs BAN 1st Test 2024: भारताने पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ खेळाच्या चौथ्या दिवशी लंचपूर्वी 234 धावांत गडगडला. भारतीय संघाच्या विजयाचा हिरो आर अश्विन ठरला. अश्विनने दुसऱ्या डावात 6 बळी घेतले. या सामन्यात त्याने शतकही केले. (हे देखील वाचा: Most Wickets in WTC: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन पोहोचला टॉप-2 वर, 'हा' गोलंदाज नंबर-1 वर)

विजयाचे ठरले 'हे' सर्वात तीन मोठे कारण

रविचंद्रन अश्विनची 113 धावांची दमदार खेळी

बांगलादेशने पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी साठी आलेला भारताचा टाॅप फलंदाज डगडगले. रोहित शर्मा 6, विराट कोहली 0 आणि शुभमन गिल 0 बाद झाले. त्यानंतर भारतासाठी रविचंद्रन अश्विन संकटमोचक ठरला. आर अश्विनने 113 धावांची दमदार खेळी केली, रवींद्र जडेजाने 86 धावा आणि यशस्वी जैस्वालने 56 धावा केल्या. आणि भारतासाठी पहिल्या डावात भारतासाठी 376 डावा जोडल्या.

पंत-गिलचे दमदार शतक

तिसऱ्या दिवशी भारताने दुसरा डाव चार विकेट गमावून 287 धावांवर घोषित केला. यासह भारताने बांगलादेशसमोर विजयसाठी 515  धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून शुभमन गिलने 176 चेंडूंत 10 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 119 धावा केल्या. तर, केएल राहुल 22 धावा करून नाबाद राहिला. ऋषभ पंतने 109 धावांची खेळी केली.

अश्विनचा कहर

अश्विनचा कहर आज चेपॉकमध्ये पाहायला मिळत आहे. त्याने पाच विकेट घेतल्या आहेत. मेहदी हसन मिराजला जडेजाने झेलबाद केले, तेव्हा अश्विनने कसोटीत 37व्यांदा एका डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला. त्याने महान शेन वॉर्नची बरोबरी केली आहे.