पदार्पणाच्याच सामन्यात मयंक यादवने महमुदुल्लाला (1) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वरुणने जाकर अलीला क्लीन बोल्ड केले. 25 चेंडूत 27 धावा करून कर्णधार नझमुल शांतो वॉशिंग्टनचा बळी ठरला. रिशाद हुसेनला (11) बाद करून वरुणने सामन्यातील तिसरी विकेट घेतली. तस्किन धावबाद झाला, तर हार्दिकने शरीफुल इस्लामला क्लीन बोल्ड केले.
याला प्रत्युत्तर म्हणून भारताने धमाकेदार सुरुवात केली. मात्र, अभिषेक शर्मा धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. अभिषेकने 7 चेंडूत 16 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने 14 चेंडूत 29 धावा केल्या. संजू सॅमसनने 19 चेंडूत 29 धावा केल्या. मेहदीने त्याला बाद केले. यानंतर नितीश आणि हार्दिक यांच्या 52 धावांच्या भागीदारीमुळे भारताने हा सामना सात विकेटने जिंकला. हार्दिकने 16 चेंडूत 39 आणि नितीशने 15 चेंडूत 16 धावांचे योगदान दिले.