IND vs BAN 3rd T20I Stats And Record Preview: हैदराबादमध्ये भारत-बांगालेदश आमनेसामने, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम

दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल.

IND vs BAN (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 3rd T20I Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. कसोटीनंतर टीम इंडियाने आता टी-20 मालिकाही नावावर केली आहे.

हेड टू हेड आकडेवारी (Head to Head Record)

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 14 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला केवळ एकच विजय मिळाला आहे. दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाचा वरचष्मा दिसतो. भारताने पाचही सामन्यांमध्ये बांगलादेशचा पराभव केला आहे. तर बांगलादेशने एकही सामना जिंकलेला नाही.

हे देखील वाचा: IND vs BAN 3rd T20I Weather Report: भारताची क्लिन स्वीपची तयारी, तर हैदराबादमध्ये पावसाचे सावट; वाचा अहवामान अहवाल

आजच्या सामन्यात होऊ शकतात हे मोठे विक्रम 

टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 धावा पूर्ण करण्यासाठी 31 धावांची गरज आहे.

बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोला टी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 54 धावांची गरज आहे.

बांगलादेशचा यष्टिरक्षक-फलंदाज लिटन दासला टी-20 क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 39 धावांची गरज आहे.

बांगलादेशचा फलंदाज महमुदुल्लाहला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 धावा पूर्ण करण्यासाठी 64 धावांची गरज आहे.

टीम इंडियाचा युवा स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 बळींचा टप्पा गाठण्यासाठी 4 बळींची गरज आहे.

टीम इंडियाचा युवा गोलंदाज रवी बिश्नोईला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 बळी पूर्ण करण्यासाठी 2 विकेट्सची गरज आहे.

बांगलादेशचा गोलंदाज शरीफुल इस्लामला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 बळींचा टप्पा गाठण्यासाठी 4 बळींची गरज आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्माला 2500 धावा पूर्ण करण्यासाठी 10 धावांची गरज आहे.

बांगलादेशचा दिग्गज गोलंदाज तस्किन अहमदला टी-20 क्रिकेटमध्ये 200 बळींचा टप्पा गाठण्यासाठी 3 बळींची गरज आहे.