IND vs ENG 4th T20I 2025 Live Streaming: भारत आणि इंग्लडं यांच्याच आज होणार अटीतटीचा लढत, कधी, कुठे आणि कसा पाहणार सामना लाईव्ह? घ्या जाणून

IND vs ENG: तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.

IND vs ENG 4th T20I 2025 Live Streaming: भारत आणि इंग्लडं यांच्याच आज होणार अटीतटीचा लढत, कधी, कुठे आणि कसा पाहणार सामना लाईव्ह? घ्या जाणून
IND vs ENG (Photo Credit - X)

पुणे: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा टी-20 सामना (IND vs ENG 4th T20I 2025) आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळला जाईल. सामन्याला संध्याकाळी 7.00 वाजता सुरुवात होईल. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG 4th T20I Head to Head: भारत आणि इंग्लडं यांच्याच रंगणार चौथा टी-20 सामना, आकडेवारीत पाहा कोण आहे वरचढ)

हेड टू हेड आकडेवारी (IND vs ENG Head to Head)

आतापर्यंत, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 27 सामने खेळले गेले आहेत. या काळात टीम इंडियाने 15 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंड संघाने 12 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील सामन्यांमध्ये सर्वाधिक धावसंख्या 224 धावांची आहे, जी टीम इंडियाने 2021 मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर केली होती. सर्वात कमी संघ धावसंख्या 165 धावा आहे.

कुठे पाहणार सामना?

भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर टी-20 मालिकेतील चौथा सामना पाहू शकतील तर डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर ऑनलाइन स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. चाहते हॉटस्टार अॅपमध्ये लॉग इन करून त्यांच्या स्मार्ट टीव्हीवर चौथ्या टी-20 सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील पाहू शकतात.

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड क्रिकेट संघ: बेन डकेट, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड

(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2025 03:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).