IND W vs WI W 3rd T20I 2024 LIVE Streaming: टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार, प्लेइंग 11, खेळपट्टीचा अहवाल आणि लाइव्ह स्ट्रीमिंगसह संपूर्ण तपशील घ्या जाणून
या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर होणार आहे.
India Women's Nation Cricket Team vs West Indies Women's Cricket Team: आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा टी-20 सामना रंगणार आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. दोन्ही संघांना तिसरा टी-20 सामना जिंकून मालिका जिंकायची आहे. भारताने पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 49 धावांनी पराभव केला होता, मात्र त्यानंतर दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा 9 विकेट्सनी पराभव केला. (हेही वाचा - IND W Beat WI W 1st T20I Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी केला पराभव, तीतास साधूची प्राणघातक गोलंदाजी)
खेळपट्टीवर फलंदाज वर्चस्व गाजवतील?
डीवाय पाटील स्टेडियमच्या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारण्यात आली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 195 धावांची मोठी मजल मारली होती. यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने 159 धावांची मजल सहज गाठली. या मैदानावर धावांचा पाठलाग करणे सोपे जाते, असे मानले जाते. त्यामुळे दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करू शकतात.
थेट प्रवाह आणि प्रसारण कधी, कुठे आणि कसे पहावे?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा T20 सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर होणार आहे. चाहते Jio सिनेमावर मोफत लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय स्पोर्ट्स-18 वर थेट प्रक्षेपण बघता येईल.
टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री, दीप्ती शर्मा, सजीवन सज्जना, राधा यादव, सायमा ठाकोर, तीतस साधू आणि रेणुका ठाकूर सिंग.
वेस्ट इंडिजचे संभाव्य प्लेइंग इलेवन-
हेली मॅथ्यू (कर्णधार), कियाना जोसेफ, डिआंड्रा डॉटिन, शमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), शबिका गझनबी, चिनेल हेन्री, करिश्मा रामहार्क, शमिलिया कोनेल, एफी फ्लेचर, जाडा जेम्स आणि मँडी मंगरू.