IND W vs SL W, 2024 ICC Women's T20 World Cup Live Streaming On DD Sports: भारत आणि श्रीलंका महिला संघातील टी 20 विश्वचषकातील सामने कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या

टी 20 विश्वचषकातील हा 12 वा सामना असेल यासंबंधीच्या तपशीलांसाठी तुम्ही संपूर्ण बातमी वाचा.

Photo Credit- X

IND W vs SL W, 2024 ICC Women's T20 World Cup Live Telecast On DD Sports: भारतीय महिला संघ विरुद्ध श्रीलंका महिला संघ 2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचा 12 वा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. 9 ऑक्टोबर बुधवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:30 वाजता सामना होईल. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून झालेल्या दणदणीत पराभवानंतर, पाकिस्तानला दरवत भारताने आपले टी 20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न जिवंत ठेवले आहे. या सामन्यात अरुंधती रेड्डीने पाकिस्तानविरुद्ध शानदार गोलंदाजी करत. पाकिस्तानला 105/5 पर्यंत मर्यादित ठेवण्यास मदत केली. पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने शफाली वर्मा (32), जेमिमाह रॉड्रिग्स (23) आणि हरमनप्रीत कौर (29) यांच्या महत्त्वपूर्ण खेळी खेळून आरामात भारताला विजय मिळवला.

भारताला आता श्रीलंकेचा पराभव करून विजयी घोडदौड सुरू ठेवायची आहे आणि प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता वाढवायची आहे. महिला टी 20 विश्वचषक 2024 भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना आज बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल.(हेही वाचा:2024 ICC Women’s T20 World Cup Points Table Update: न्यूझीलंडवर 60 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वल स्थानी; महिला टी 20 विश्वचषकाचे पॉईंट टेबल पहा )

सामना कुठे पहाल?

आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2024 सामन्याचे अधिकृत थेट प्रक्षेपण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर मॅच थेट प्रसारित केली जाईल. दुसरीकडे, सामना Disney+ Hotstar ॲपवर पाहण्यासाठी उपलब्ध असेल. पण भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याचे टेलिकास्ट दूरदर्शन नेटवर्कवर (डीडी स्पोर्ट्स किंवा डीडी नॅशनल) डीडी फ्री डिशवर उपलब्ध असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif