IND (W) vs SA (W) 2021: भारतीय महिला क्रिकेटचे कमबॅक, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे, टी-20 मालिकेसाठी BCCI ने घोषित केली टीम

तब्बल एक वर्षाच्या ब्रेकनंतर भारत महिला क्रिकेट संघाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन निश्चित झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिका महिला संघाविरूद्ध मर्यादित ओव्हरच्या मालिकेच्या वेळापत्रकाची आणि संघाची घोषणा केली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ (Photo Credit: Twitter/ICC)

IND (W) vs SA (W) 2021: तब्बल एक वर्षाच्या ब्रेकनंतर भारत महिला क्रिकेट संघाचे (India Women's Team) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन निश्चित झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दक्षिण आफ्रिका महिला (South Africa Women) संघाविरूद्ध मर्यादित ओव्हरच्या मालिकेच्या वेळापत्रकाची आणि संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ (Indian Team) 7 मार्च ते 23 मार्च दरम्यान लखनौमध्ये 5 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाचे यजमानपद भुषवेल. लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकाना आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मिताली राजला (Mithali Raj) एकदिवसीय संघाची कर्णधार तर हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) टी-20 संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात अली आहे. एकदिवसीय आणि टी -20 संघातून शिखा पांडे, वेदा कृष्णमूर्ती, एकता बिष्ट आणि तान्या भाटिया यांना वगळण्यात आले आहेत.

8 मार्च रोजी मेलबर्न येथे झालेल्या महिला टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाने कोणताही स्पर्धात्मक क्रिकेट सामना खेळलेला नाही. मात्र, युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग 2020 प्लेऑफ दरम्यान 4 सामन्यांच्या महिला टी-20 चॅलेंजमध्ये भारतीय खेळाडूंचा समावेश होता. मिताली राज, स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौरने संघाचे नेतृत्वात करत शारजाहमध्ये सामने खेळले. दुसरीकडे, सुरुवातीला तिरुअनंतपुरम येथे मालिके आयोजन करण्यासाठी निवडले गेले होते पण केरळ क्रिकेट असोसिएशनने या सामन्यांचे आयोजन करण्यास असमर्थता दर्शवली होती.मर्यादित षटकांच्या मालिकेत दोन्ही संघांचे खेळाडू क्वारंटाइन असतील आणि बायो-बबल वातावरणात राहतील.

एकदिवसीय मालिकेसाठी भारत महिला संघ: मिताली राज (कॅप्टन), स्मृती मंधाना, जेमिमह रॉड्रिग्स, पुनम राऊत, प्रिया पुनिया, यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), डायलान हेमलता, दीप्ती शर्मा, सुषमा वर्मा (विकेटकीपर), श्वेता वर्मा (विकेटकीपर), राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, पूनम यादव, सी. प्रत्युषा आणि मोनिका पटेल.

भारतीय महिला टी-20 संघ: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमीमह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष, हर्लीन देओल, सुषमा वर्मा (विकेटकीपर), आयुषी सोनी, अरुंधती रेड्डी, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, मानसी जोशी, मोनिका पटेल, सी. प्रत्युषा, सिमरन दिल बहादूर.

भारत महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिलांचे पूर्ण वेळापत्रक

पहिला वनडे, 7 मार्च

दुसरा वनडे, 9 मार्च

तिसरा वनडे, 12 मार्च

चौथा वनडे, 14 मार्च

पाचवा वनडे, 17 मार्च

आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका

पहिली टी-20 आय, 20 मार्च

दुसरा टी-20 आय, 21 मार्च

तिसरा टी-20 आय, 23 मार्च

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now