IND W vs ENG W ODI 2021: टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव, मिताली राजचे झुंजार अर्धशतक व्यर्थ; इंग्लंडची मालिकेत 2-0 विजयी आघाडी
इंग्लंड महिला क्रिकेट संघाने टॉन्टन झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या दुसर्या सामन्यात टीम इंडियाला 5 गडी राखून पराभूत केले आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. कर्णधार मिताली राजची दुसरे सलग अर्धशतक व्यर्थ ठरले कारण इंग्लंडला केट क्रॉसच्या पाच विकेट्स आणि सोफिया डन्कलीच्या अर्धशतकी खेळीने भारतावर विजय मिळवून दिला.
IND W vs ENG W ODI 2021: इंग्लंड महिला (England Women) क्रिकेट संघाने टॉन्टन (Taunton) झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेच्या दुसर्या सामन्यात टीम इंडियाला (Team India) 5 गडी राखून पराभूत केले आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. कर्णधार मिताली राजची (Mithai Raj) दुसरे सलग अर्धशतक व्यर्थ ठरले कारण इंग्लंडला केट क्रॉसच्या (Kate Cross) पाच विकेट्स आणि सोफिया डन्कलीच्या (Sophia Dunkley) अर्धशतकी खेळीने भारतावर विजय मिळवून दिला. टीम इंडियाची बॅटने पुन्हा अपयशी कामगिरी सुरूच राहिली. कर्णधार मिताली एकाबाजूने विकेट सांभाळून खेळत होती मात्र अन्य खेळाडूंची तिला साथ न मिळाल्याने संपूर्ण संघ 221 धावांवर माघारी परतला. भारताकडून मिताली राजने सर्वाधिक 59 धावा केल्या आणि युवा फलंदाज शेफाली वर्माने 44 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, ब्रिटिश गोलंदाज क्रॉसने उत्कृष्ट गोलंदाजी करत 5 भारतीय खेळाडूंना पॅव्हिलियनचा मार्ग दाखवला. (BCCI कडून खेल रत्न पुरस्कारासाठी Mithali Raj, रविचंद्रन अश्विनच्या नावाची शिफारस, या 3 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी केले नामांकित)
222 धावांचे लक्ष्य इंग्लंडने 47.3 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून अगदी सहज गाठले. इंग्लंडकडून सोफिया डन्कलीने शानदार फलंदाजी करत 73 धावांची नाबाद खेळी केली तर लॉर्न विनफिल्डनेही 42 धावा केल्या. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची आघाडीची फळी रखडली आणि त्यांनी 28.5 ओव्हरमध्ये 133 धावांवर पाच विकेट्स गमावल्या. मात्र नंतर डन्कली व कॅथरीन ब्रंट यांच्यातील सहाव्या विकेटसाठी 92 धावांच्या भागीदारीने संघाचा विजय निश्चित केला. दरम्यान, फलंदाजी करताना दुखापत झाल्यामुळे इंग्लंड धावांचा पाठलाग करताना राज मैदानात उतरली नाही व तिच्या उपकरणदाहर हरमनप्रीत कौरने संघाचे नेतृत्व केले. राधा यादव हे राजच्या जागी पर्यायी फिल्डर होती.
तत्पूर्वी, पहिल्या वनडे सामन्यात 72 धावा ठोकलेल्या 38 वर्षीय राज पुन्हा संघाच्या मदतीला धावून आली. मितालीने आपल्या 92 चेंडूच्या खेळीत सहा चौकार खेचले व ब्रिटिश गोलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण केट क्रॉसच्या घातक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. भारताकडून स्मृती मंधानाने 22, प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनम राऊतच्या जागी समावेश केलेल्या जेमीमाह रॉड्रिग्जचा बॅटने संघर्ष सुरूच राहिला. जेमीमाह 8 धावाच करू शकली. त्यानंतर राज आणि उपकर्णधार हरमनप्रीतने डाव सावरला व 103 चेंडूंत 68 धावांची भागीदारी करत भारताला शंभरी पार करून दिली. पण संघ नियमित अंतराने विकेट गमावत असल्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)