IND vs WI T20I Series 2022: विराट कोहली -रोहित शर्मा बनू शकतात टी-20 चे बादशाह, विंडीजविरुद्ध भारतीय फलंदाजांच्या निशाण्यावर असेल ‘हा’ मोठा रेकॉर्ड

टीम इंडिया बुधवारपासून वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत माजी कर्णधार विराट कोहली आणि विद्यमान कर्णधार रोहित शर्मा यांना विशेष यादीत स्थान मिळवण्याची संधी असेल. विंडीजविरुद्ध ची सध्याची मालिका आज, 16 फेब्रुवारी) कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सुरू होत आहे. मालिकेतील पहिला टी-20 सामना संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होईल.

रोहित शर्मा, विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs WI T20I Series 2022: कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ (Indian Team) सज्ज झाला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना विंडीजविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत मार्टिन गप्टिलला (Martin Guptill) मागे टाकण्याची संधी आहे. हे दोन्ही दिग्गज फलंदाज न्यूझीलंडचा सलामीवीर गप्टिलचा विक्रम मोडू शकतात. सध्या या फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक धावा (Most Runs in T20I) करण्याच्या बाबतीत गप्टिल पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या टी-20 सामन्यासाठी मैदानात उतरताच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्यासाठी स्पर्धा सुरु होईल. आणि या मालिकेच्या शेवटी एक भारतीय फलंदाज टी-20 क्रिकेटचा बादशाह बनेल. (IND vs WI 1st T20I Likely Playing XI: रोहित शर्माचा कोण बनणार ओपनिंग पार्टनर? पहिल्या T20 साठी पहा टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग 11 खेळाडू)

या यादीत सध्या गुप्टिल 3299 धावांसह अव्वल क्रमांकावर आहे. तर कोहली 3227 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि भारताचा व्हाईट-बॉल कर्णधार रोहित शर्मा 3197 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय जोडीनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग यांच्या नावावर 2676 आणि 2660 धावा आहेत. गेल्या वर्षी न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यात गप्टिलने त्याला मागे टाकले तोपर्यंत कोहली या यादीत अव्वल होता. 2021 पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या समाप्तीनंतर कोहलीने मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे रोहित आणि कोहली या दोघांनाही गुप्टिलला मागे टाकण्याची संधी आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त तीन खेळाडूंनी 3000 धावांचा ठप्प ओलांडला आहे. त्यामुळे, विंडीजविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आपापसात स्पर्धा करण्यासोबतच या दोन सर्वोत्तम फलंदाजांना टी-20 चा किंग बनण्याचीही संधी असेल.

तसेच विद्यमान आणि माजी भारतीय कर्णधार देखील टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोडी म्हणून 1000 धावा पूर्ण करू शकतो. ते हा टप्पा गाठण्यापासून 58 धावा दूर आहेत. विराट वगळता रोहितने टी-20 मध्ये शिखर धवनसोबत 1743 धावा आणि केएल राहुलसह 1535 धावांची भागीदारी केली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला T20 सामना बुधवार 16 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. उभय संघांमधील तीनही टी-20 सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवले जातील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now