IND vs WI: Rohit Sharma ते Rishabh Pant; हे 5 खेळाडू बनवू शकतात भारत-वेस्ट इंडिज टी-20 मालिका रंगतदार

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज आहे. यासाठी रविवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघातील या पाच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर आगामी टी-20 क्रिकेट सिरीज पाहणे खूप मजेदार होणार आहे.

रोहित शर्मा, रिषभ पंत, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि मनीष पांडे (Photo Credit: Getty Images)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक सेमीफायनलमध्ये निराशाजनक खेळीनंतर भारतीय संघ (Indian Team) वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी सज्ज आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) च्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 3 ऑगस्ट पासून विंडीज दौऱ्यावर असणार आहे. यादरम्यान संघ 3 टी-20, 3 वनडे आणि 2 टेस्ट मालिका खेळणार आहे. आणि यासाठी रविवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. तिन्ही मालिकांसाठी कोहली कर्णधार पद सांभाळेल तर रोहित शर्मा उपकर्णधार असेल. विंडीज दौऱ्यासाठी जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि महेंद्र सिंग धोनी यांना विश्रांती देण्यात आली आहे. बुमराह हा केवळ टेस्ट संघाचा भाग आहे. (IND Vs WI: वेस्ट इंडिज दौ-यासाठी भारतीय संघ जाहीर, विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मध्ये कोणाला मिळाली संधी)

दरम्यान, विंडीज विरुद्ध संघात अनेक नवीन खेळाडूंना देखील संधी देण्यात आली आहे. यात आयपीएल गाजवलेले खेळाडू- श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), कृणाल पंड्या (Krunal Pandya), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar), राहुल चाहर (Rahul Chahar), दीपक चाहर (Deepak Chahar), नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि खलील अहमद (Khaleel Ahmed) यांना टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. दुसरीकडे, धोनी संघात नसल्याने रिषभ पंत (Rishabh Pant) याला विकेटकिपिंगची जबाबदारी देण्यात आली आहे. तर टेस्ट संघात पंत शिवाय वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याची देखील संघात वर्णी लागली आहे. साहा तब्बल दीड वर्षांनी भारतीय संघात परतला आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध मागील वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या दुखापतीनंतर साहा खेळू शकला नाही. टी-20 मालिकांसाठी भारतीय संघाच्या घोषणेनंतर हे बोलणे चुकीचे नाही की आगामी मालिका खूप इंटरेस्टिंग होणार आहे. भारतीय संघातील या पाच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर आगामी टी-20 क्रिकेट सिरीज पाहणे खूप मजेदार होणार आहे. हे आहे हे पाच खेळाडू ज्यांच्यामुळे ही सिरीज खूप रोमांचक ठरेल:

रोहित शर्मा (Rohit Sharma)

रोहित शर्मा (Image Credit: AP/PTI Photo)

'हिटमॅन' सध्या आपल्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याच्या तुफानी खेळीचा एक नमुना आपण सर्वांनी नुकतेच पार पडलेलय क्रिकेट विश्वकपमध्ये पहिले. रोहितने यंदाच्या आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. टी-20 मध्ये देखील रोहितचा रेकॉर्ड चांगला आहे. आजवर त्याने विंडीज विरुद्ध 10 टी-20 सामने खेळत एक शतक आणि दोन अर्धशतक झळकावले आहे. आणि रोहितने जर आपला फॉर्म कायम राखला तर तो कॅरबियन गोलंदाजांसाठी एक वाईट स्वप्न बनू शकतो. विश्वकपमधील खेळीनंतर चाहत्यांना पुन्हा एकदा शर्माजींच्या मुलाकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

मनीष पांडे (Manish Pandey)

मनीष पांडे (Photo Credits: Getty Images)

भारत ए संघाचा कर्णधार मनीषने वेस्ट इंडिज ए विरुद्ध अनधिकृत वनडे सामन्यात आपल्या प्रभावी कामगिरीने टीम इंडियामध्ये स्थान मिळवले आहे. मनीषने विंडीज ए संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. आणि आगामी टी-20 आणि वनडे मालिका त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे भारतीय संघात आपली जागा प्रभळ करण्यासाठी. मनीषच्या समावेशाने संघाच्या मधल्या फळीची चिंता दूर होऊ शकते. नुकतेच पार पडलेल्या विश्वकपमध्ये भारताची मधली फळी कमकुवत दिसत होती आणि मनीष आपल्या खेळीने ती मजबूत करू शकतो.

विराट कोहली 

विराट कोहली (Photo Credit: Getty Image)

टीम इंडियाचा कर्णधार विराटची त्याच्या विश्वकपमधील निर्णयांवर आणि नेतृत्वावर अनेकांनी टीका केली होती. पण 'रन मशीन' म्हणून ओळखला जाणारा विराट पुन्हा एकदा आपल्या आक्रमक खेळीने गोलंदाजांच्या नाकी-नऊ अनु इच्छित आहे. कोहलीने 67 टी-20 सामने खेळले आहे पण त्याने एकही शतक केले नाही. आगामी सिरीजमध्ये विराट आपला हा दुष्काळ संपण्याचा प्रयत्न असेल.

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)

रवींद्र जडेजा (Photo Credits: Getty Images)

जडेजाला यंदा विश्वकपमध्ये जास्त सामने खेळायाला मिळाले नाही पण जितके सामने तो खेळाला त्या सर्वांमध्ये त्यांने उत्कृष्ट कामगिरी करत त्याने चाहत्यांचे मन जिंकले. न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सेमीफायनलमध्ये जडेजाने खेळल्या खेळीने अंतिम चेंडू पर्यंत सर्वांच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण जडेजा आऊट होताच त्याही धुळीस मिळाल्या. हार्दिकच्या अनुपस्थितीत जडेजावर एक अष्टपैलू म्हणून मोठी जबाबदारी असणार आहे. बिकट परिस्थितीतून संघाला सावरण्याचे काम जडेजाला करावे लागणार आहे.

रिषभ पंत

रिषभ पंत (Photo by Robert Cianflone/Getty Images)

भारतीय चाहत्यांच्या सर्व नजर संघाच्या युवा खेळाडू रिषभ पंत वर असणार आहे. धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पहिल्या जाणाऱ्या पंतकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा आहे. आगामी सिरीजमध्ये पंतवर जगातील सर्वात बेस्ट फिनिशरची जागा भरून काढण्याची जबाबदारी असणार आहे. विश्वकप मध्ये पंत काही खास खेळी करू शकला नाही पण विंडीज विरुद्ध संतोष जनक खेळी करत त्याला आपली निवड योग्य सिद्ध करायची आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघात खूप जबरदस्त खेळाडू आहेत. भारतीय संघातील या पाच खेळाडूंकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून असणार आहे. त्यांच्या खेळीने ही सिरीज खूप इंटरेस्टिंग होणार आहे यात कोणतीही शंका नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now