IND vs WI, CWC 2019: टीम इंडियाचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय; संघात कोणताही बदल नाही

भारतानेत कोणताही बदल केला नाही.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात टॉस जिंकत विराट कोहली ने पहिले फलंदाजी/गोलंदाजी चा निर्णय घेतला. भारतानेत कोणताही बदल केला नाही. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज मॅन्चेस्टर च्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सामना होणार आहे. विश्वकप मध्ये भारतीय संघाची सध्या विजयी घौडदौड सुरु आहे. भारतीय संघानं आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत तर, एक सामना पावसामुळं रद्द झाला. आज वेस्ट इंडिजला नमवत सेमिफायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित करू शकतो. (IND vs WI, CWC 2019: इंग्लंड च्या धरतीवर आणखी एक शतक आणि रोहित शर्मा मोडणार विवियन रिचर्ड्स, केन विलियमसन चा हा मोठा विक्रम)

मात्र, वेस्ट इंडिजचा पराभव करणे भारतासाठी सोपे असणार नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू कार्लोस ब्रॅथवेट ची तुफानी खेळी सर्वांच्या स्मरणात राहणारी आहे. वेस्ट इंडिजला केवळ पाच धावांनी पराभव पत्करावा लागल्याने त्यांच्या उपांत्य फेरीच्या अपेक्षांन सुरुंग लावला. पण, तरीही अन्य संघांच्या कामगिरीवर विंडीजच्या किंचितशा आशा कायम आहेत.

विश्वकपमधे दोन्ही संघ एकूण आठवेळा आमने-सामने आले. त्यात भारताने 5, तर विंडीजने 3 विजय मिळवले आहेत. ओल्ड ट्रॅफर्डवर हे दोन उभय संघ दुसऱ्यांदा एकमेकांशी भिडतील.

टीम इंडिया : रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली (कॅप्टन), केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, विजय शंकर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

टीम वेस्ट इंडिज:  जेसन होल्डर (कॅप्टन), ख्रिस गेल, शाय होप, शिम्रॉन हेटमायर, निकोलस पूरन (विकेटकीपर), सुनील अ‍ॅम्ब्रिज, कालरेस ब्रॅथवेट, फॅबिअन अ‍ॅलन, अ‍ॅश्ले नर्स, श्ॉनन गॅब्रिएल, शेल्डन कॉट्रेल, ओशेन थॉमस, केमार रोच.