IND vs WI, CWC 2019: चहू बाजूनी टीका सहन करणाऱ्या धोनी ला विराट कोहली चा पाठिंबा, म्हणाला कधी आक्रमक फलंदाजी करायची आणि कधी नाही हे धोनीला माहित आहे

मात्र, वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यादरम्यान कर्णधार विराट धोनीच्या समर्थानात आला आणि टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. कोहली म्हणाला की धोनीचा अनुभव हा टीमसाठी मोलाचा आहे.

भारतीय संघाने विश्वकपमध्ये सलग सलग पाचवा विजय मिळवत सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध झालेल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) च्या दमदार फटके बाजी च्या जोरावर इंडिजसमोर 269 धावांचे आव्हान ठेवले होते. मागील काही दिवसा पासून धोनीच्या खेळीबाबत सर्वत्र टीका होत होती. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यादरम्यान कर्णधार विराट धोनीच्या समर्थानात आला आणि टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. (IND vs WI, ICC World Cup 2019: शाय होप नं उडवली होती झोप, 'बॉल-बॉल' वाचला धोनी Video)

विराट म्हणाला धोनी हा टीम इंडिया (Team India) चा सर्वात मोठा फिनीशर आहे. सामन्यानंतर विराट ने सांगितले, "धोनीच्या अनुभवाचा आम्हाला नेहमीच फायदा होतो. जेव्हा धोनी खेळत नाही तेव्हा त्याच्यावर टीका करतात पण आम्ही सर्व त्याच्यासोबत आहोत. धोनीने टीमसाठी असंख्य सामने जिंकवले आहेत".

कोहली पुढे म्हणाला की धोनीचा अनुभव हा टीमसाठी मोलाचा आहे. "सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा तुम्हाला 15-20 धावांची गरज असते, तेव्हा धोनी आपल्या आक्रमक फलंदाजीने ते करतात. धोनीला कधी आक्रमक फलंदाजी करायची आणि कधी नाही हे माहित आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत असतो", असेही सांगितले

वेस्ट इंडिजविरोधात धोनीने 61 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारा च्या मदतीने नाबाद 56 धावा केल्या. आघाडीचे फलंदाज चांगली फलंदाजी करू शकले नाही, धोनीने हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सोबत फलंदाजी करत टीम इंडिया मोठा स्कोर करण्यास मदत केली.