IND vs WI: ‘काय झालं तुला... नीट धावत का नाहीस? चल पळत जा’, फिल्डिंग सेट करताना युजवेंद्र चहलवर चिडला रोहित शर्मा (Watch Video)
रोहित शर्मा लेगस्पिनर युजवेंद्र चहलवर चिडलेला दिसला. हा व्हिडिओ विंडीजच्या डावातील 45 व्या षटकाचा आहे, जेव्हा टीम इंडिया आपल्या लक्ष्याचा बचाव करत होती. क्षेत्ररक्षण दरम्यान चहलला चुकीच्या ठिकाणी उभे असलेले रोहितने पाहिले तेव्हा त्याला राग आला. रोहित चहलला म्हणाला, “तुला काय झालं, तू नीट का धावत नाहीये? चल तिकडे पळून जा.” रोहितचा हे शब्द स्टंप माईकमध्ये कैद झाले.
IND vs WI 2nd ODI: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजचा (West Indies) 44 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने मालिकेत 2-0 ने विजयी आघाडीवर घेतली आहे. तसेच या विजयासह पूर्ण-वेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सुरुवातही चांगली झाली आहे. पण दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक वेळ अशी आली जेव्हा चाहत्यांना कर्णधार रोहितचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला. रोहित टीम इंडियाच्या एका खेळाडूवर चांगलाच चिडला. भारताने दिलेल्या 238 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या डावा दरम्यान रोहितने स्वतःवरील ताबा गमावला. (IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध Rishabh Pant याला ओपनिंगला पाठवण्यामागे काय होता टीम इंडियाचा गेम प्लॅन, कर्णधार रोहित शर्माने सांगितला)
झाले असे की वेस्ट इंडिजच्या डावातील 45 व्या षटकात रोहितने चेंडू वॉशिंग्टन सुंदरकडे सोपवला. त्यावेळी युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) मिड-ऑफला क्षेत्ररक्षण करत होता. रोहित चहलला लाँग ऑफवर परत जाण्यास सांगत होता पण त्याने आळशीपणा दाखवला ज्यामुळे रोहितला राग अनावर झाला आणि त्याने चहलला मैदानावरच खडसावले. चहल आरामात धावून फिल्डिंग पोझिशनवर गेल्याने चिडलेल्या त्याने चहलला ओरडले आणि धावायला सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित चहलवर ओरडताना स्पष्टपणे ऐकू येत आहे. रोहितने चहलला ओरडून परत जाण्यास सांगितले. रोहितने चहलला फटकारले आणि म्हणाला, “परत जा, तू पळून का जात नाहीस? चला तिकडे पळत जा.” यानंतर चहल फिल्डिंगच्या ठिकाणी गेला. रोहितचा असा रौद्र रूपात पहिल्यांदाच मैदानावर पाहायला मिळाले.
सामन्याबद्दल बोलायचे तर अहमदाबाद येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 44 धावांनी पराभव करत मालिका काबीज केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात फलंदाजांच्या खराब खेळीमुळे वेस्ट इंडिज संघ 46 षटकांत केवळ 193 धावाच करू शकला. प्रसिद्ध कृष्णाने भारताच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. त्याने 9 षटकात 12 धावा देऊन 4 विकेट घेतल्या, तर त्यापूर्वी सूर्यकुमार यादवने 64 धावांची खेळी केली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)