IND vs WI 3rd T20I मॅचनंतर रोहित शर्मा याने घेतली रिषभ पंत याची मुलाखत; युजवेंद्र चहल याने प्रश्न विचारात BCCI ची घेतली फिरकी, पहा हे Tweet

रोहितने पंतची घेतलेल्या मुलाखतीवरून चहलने फिरकी घेत बीसीसीआयला प्रश्न विचारला. बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देत चहलने लिहिले, ''माझी उणीव जाणवतेय का?'

युझवेन्द्र चहल, रोहित शर्मा आणि रिषभ पंत (Photo Credit: @BCCI/Yuzi_Chahal/Twitter/Instagram)

भारत (India)-वेस्ट इंडिज (West Indies) मधील अखरेच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने यजमान विंडीजवर 7 गडी राखून मात केली. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेलं 147 धावांचं आव्हान भारताने रिषभ पंत  (Rishabh Pant) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. पंतने 42 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 65 धावांची खेळी केली. याचबरोबर टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत व्हाईट वॉश केला. विंडीजविरुद्ध टी-20 सामन्यातील पहिल्या दोन मॅचमध्ये पंतला चांगली कामगिरी करता आली नव्हती. दोन्ही सामन्यात खराब शॉट मारत पंत बाद झाला. मात्र अखेरच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करत त्याने दमदार कमबॅक केले. (IND vs WI 3rd T20I मॅचमध्ये एमएस धोनी याचा रेकॉर्ड मोडत रिषभ पंत याने रचला नवीन इतिहास, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, या सामन्यात विश्रांती मिळालेल्या रोहित शर्मा (Rohit Sharm) याने मॅच संपल्यानंतर बीसीसीआय (BCCI) टीव्हीवर युझवेन्द्र चहल (Yuzvendra Chahal) याची जागा घेतली. पंत म्हणाला की, "मला ही अर्धशतकी खेळी करून आनंद झाला. दोन सामन्यात धावा करता येत नव्हत्या, त्यामुळं मी निराश होतो. मात्र आता मला आनंद होत आहे की मी चांगली कामगिरी करू शकलो", असे सांगितले. पण रोहितने पंतची घेतलेल्या मुलाखतीवरून चहलने फिरकी घेत बीसीसीआयला प्रश्न विचारला. बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देत चहलने लिहिले, ''माझी उणीव जाणवतेय का?' यावर बीसीसीआयने देखील त्वरित उत्तर दिले.

दुसरीकडे, विंडीजविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात नाबाद 65 खेळी करत पंतने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचा विक्रम मोडीत काढला. धोनीने 2017 मध्ये बंगळुरू येथे इंग्लंडविरुद्ध टी-20 मध्ये 56 धावांची खेळी केली होती. भारतीय यष्टिरक्षकाची ती सर्वोत्तम खेळी होती. पण, पंतने मंगळवारी वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 65 धावा करून हा विक्रम मोडला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif