IND vs WI 3rd T20I: कीरोन पोलार्ड याची धमाकेदार खेळी, भारताला क्लीनस्वीपसाठी 147 धावांचे लक्ष्य

कीरोन पोलार्ड याने महत्वाची खेळी केली आणि संघाचा डाव सावरला. पोलार्डने 45 चेंडूत 6 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 58 धावा केल्या.

भारतीय संघ (Photo Credit/Getty Image)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजयासाठी भारतासमोर धावांचे 147 लक्ष्य देण्यात आले आहेत. आजच्या सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली होती. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातील 3 विकेट घेत वेस्ट इंडिजला मोठा धक्का दिला होता. भारताच्या दीपक चाहर याने विंडीजचे पहिले तीन फलंदाज-एव्हिन लुईस, सुनील नारायण आणि शिमरॉन हेटमायर यांना स्वस्तात बाद करत संघाला उत्कृष्ट सुरुवात करून दिली. त्यानंतर कीरोन पोलार्ड याने महत्वाची खेळी केली आणि संघाचा डाव सावरला. पोलार्डने 45 चेंडूत 6 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 58 धावा केल्या. पोलार्डच्या या तुफानी खेळीच्या जोरावर विंडीजला मोट साकोरे करण्यास मदत झाली. (टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवि शास्त्री राहणार? CoA समिती परदेशी प्रशिक्षक नियुक्त करण्याच्या विचारात नाही)

आजच्या या सामन्यात भारतासाठी दीपक चाहर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर नवदीप सैनी याने 2 तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या राहुल चाहर याने 1 गडी बाद केला. दुसरीकडे, विंडीजसाठी पोलार्डने सर्वाधिक धावा केल्या. तर नारायण आणि हेटमायरने प्रत्येकी 2 आणि १ धावा केल्या.

पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजच्या या सामन्यातदेखील विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. आजच्या सामन्यात भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला होता. उपकर्णधार रोहित शर्मा याला विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी केएल राहुल याची वर्णी लागली. तर दुसरीकडे, रवींद्र जडेजा याला देखील संघातून वगळण्यात आले. त्याच्या जागी युवा राहुल चाहर याला संधी देण्यात आली आहे. आजच्या सामन्यातून राहुलचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झाले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif