IND vs WI 3rd T20I: टीम इंडियाचा संघर्षपूर्ण विजय, वेस्ट इंडिजचा 67 धावांनी पराभव करत मालिकेत मिळवला 2-1 ने विजय
भारताने दिलेल्या 241 धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजला निर्धारित ओव्हरमध्ये 8 बाद 173 धावाच करता आल्या. विंडीजकडून कर्णधार किरोन पोलार्ड याने सर्वाधिक 68 धावा केल्या, तर शिमरोन हेलमेयर याने 41 धावांचे योदान दिले.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम टी-20 सामन्यात टीम इंडियाने (India) वेस्ट इंडिज (West Indies) चा 67 धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या 241 धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजला निर्धारित ओव्हरमध्ये 8 बाद 173 धावाच करता आल्या. विंडीजकडून कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) याने सर्वाधिक 68 धावा केल्या, तर शिमरोन हेटमायर (Shimron Hetmyer) याने 41 धावांचे योदान दिले. वेस्ट इंडीजने टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण भारतीय फलंदाजांनी त्यांची क्लास घेतली. टीम इंडियाकडून कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि मोहम्मद शमी याने प्रत्येकी 2 गडी बाद करत संघाचा विजय निश्चित केला. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या विंडीजची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या 17 धावांवर विंडीजने 3 गडी गमावले. दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा लेंडल सिमंस 7 धावांवर परतला. त्यानंतर हेटमेयर आणि पोलार्डने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. (IND vs WI 3rd T20I: रोहित शर्मा ने केली विराट कोहली ची बरोबरी, वर्षाखेरीस दोघे बनले टी-20 चे किंग, वाचा सविस्तर)
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज संघाला पहिला फटका ब्रॅन्डन किंग याच्या रूपात लागला. किंग 5 धावांवर झेलबाद झाला. सिमंस 7 धावांवर श्रेयस अय्यरकडे कॅच आऊट झाला. निकोलस पूरन खाते न उघडता पॅव्हिलिअनमध्ये परतला. पोलार्डने हेटमायरच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारीही झाली. दोघे फलंदाज भारतासाठी डोकेदुखी बनताना कुलदीप यादव याने हेलमेयरला केएल राहुल याच्याकडे झेलबाद करत मोठे यश मिळवून दिले. पण, पोलार्डने मोठे शॉट लागवणे सुरु ठेवले. पोलार्डने 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 68 धावा केल्या.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाला रोहित शर्मा आणि राहुलच्या सलामी जोडीने तुफानी सुरुवात दिली. दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली. रोहित 71, राहुल 91 आणि कर्णधार विराट कोहली याने नाबाद 70 धावांची खेळी केली.