IND vs WI 3rd T20I: टीम इंडियाने वनडेनंतर टी-20 मालिकेत साफ केला वेस्ट इंडिजचा सुपडा, तिसऱ्या टी-20 त बनले हे खास रेकॉर्ड, वाचा सविस्तर

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 17 धावांनी पराभव केला. दरम्यान भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसऱ्या टी-20 सामन्यात काही महत्वपूर्ण रेकॉर्ड देखील बनले जे खालीलप्रमाणे आहेत.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (Photo Credit: PTI)

IND vs WI 3rd T20I Stat Highlights: भारताने (India) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा (West Indies) क्लीन स्वीप केला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 17 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 184 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात विंडीज संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 167 धावाच करू शकला. परिणामी भारताने हा सामना जिंकून संपूर्ण दौऱ्यात किरोन पोलार्डच्या वेस्ट इंडिजचा क्लीन स्वीप केला. यापूर्वी एकदिवसीय मालिकेत देखील रोहित ब्रिगेडने वर्चस्वापुर्ण कामगिरी करून विंडीजचा सुपडा साफ केला होता. दरम्यान भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसऱ्या टी-20 सामन्यात काही महत्वपूर्ण रेकॉर्ड देखील बनले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs WI 3rd T20I: टी-20 मध्येही टीम इंडिया अपराजित; वेस्ट इंडिज संघाचा रोहित ब्रिगेडने केला ‘डबल क्लीन स्वीप’, शार्दूल ठाकूरने पालटला सामना)

1. भारताचा स्टायलिश फलंदाज श्रेयस अय्यरने T20I मध्ये 50 चौकार पूर्ण करण्यासाठी चार चौकार पूर्ण केले.

2. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध ‘डबल क्लीन स्वीप’ पूर्ण केला आहे. यापूर्वी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत देखील रोहित शर्माच्या नेतृत्वात देखील टीम इंडिया अजेय होती.

3. वेस्ट इंडिजविरुद्ध T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने कहर केला आणि तो त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळण्यात यशस्वी ठरला. यादवने 31 चेंडूत एक चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. सूर्यकुमार यादवच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी आहे. यापूर्वी त्याने न्यूझीलंडविरुद्ध 62 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.

4. रोहित शर्माने ईडन गार्डन्सवर नुकताच झालेला तिसरा सामना जिंकून ती-20 फॉरमॅटमध्ये चार द्विपक्षीय मालिकेत (3 किंवा अधिक सामने) व्हाईटवॉश करणारा पहिला भारतीय कर्णधार बनून इतिहास रचला आहे. रोहितच्या नेत्रत्वत भारताने याआधी श्रीलंका (2017), वेस्ट इंडिज (2018), न्यूझीलंड (2021) विरुद्ध क्लीन स्वीप केला होता.

5. ईडन गार्डन्स येथील तिसरा टी-20 सामना जिंकून भारताने संपूर्ण दौऱ्यात वेस्ट इंडिजचा क्लीन स्वीप केला असून अशी कमाल करण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2017 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्यावर यजमान श्रीलंकेचा तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, ODI, T20) 9-0 असा क्लीन स्वीप केला होता.

6. वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी-20मध्ये वेगवान गोलंदाज आवेश खानला पदार्पणाची संधी मिळाली. T20 मध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारा तो 96 वा क्रिकेटपटू ठरला.

7. भारताविरुद्ध T20I मध्ये सलग तीन अर्धशतके नोंदवणारा निकोलस पूरन हा दुसरा खेळाडू ठरला.

8. या विजयासह भारत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा संघ बनला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif