IND vs WI 3rd T20I: टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजचा 3-0 ने क्लीन स्वीप; अंतिम टी-20 मध्ये 7 विकेट्सने केला पराभव

या विजयासह भारताने विंडीज विरुद्ध क्लीन स्वीप मिळवला आहे.

विराट कोहली आणि रिषभ पंत (Photo Credit: @BCCI/Twitter)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने विंडीज विरुद्ध क्लीन स्वीप मिळवला आहे. भारताने याआधी मागील दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता. पावसाने व्यत्यय घातलेल्या सामन्यात भारताने टॉस जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी करण्यास आमंत्रित केले. दीपक चाहर (Deepak Chahar) याने भारताच्या या निर्णयाचा फायदा उचलला. चाहरने वेस्ट इंडिजच्या पहिल्या तीन फलंदाजांना बाद करत विंडीजला मोठा धक्का दिला. पण त्यानंतर मात्र कीरोन पोलार्ड (Kieron Pollard) याने एकाकी झुंज लढवत अर्धशतक झळकावले. पोलार्डने 45 चेंडूंमध्ये सहा षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्याने 58 धावांची खेळी केली. पोलार्डची खेळी विंडीजसाठी महत्वाची होती. यामुळे संघाला आव्हानात्मक स्कोर करण्यास सहाय्य झाले. (World Cup 2003 मध्ये भारत विरुद्ध झालेल्या पराभवाबद्दल शोएब अख्तर याने केला धक्कादायक खुलासा, सामन्यापूर्वी घेतले होते पाच इंजेक्शन्स)

दरम्यान, भारतासाठी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि युवा खेळाडू रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी प्रभावी खेळी केली. कोहलीने 59 धावा केल्या तर पंतने 65 धावा केल्या. भारताचे दोन्ही सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांच्या लवकर बाद झाल्यावर कोहली आणि पंतने डाव सावरला आणि संघाला विजयाकडे नेले. याआधी दीपक चाहर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर नवदीप सैनी (Navdeep Saini) याने 2 तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या राहुल चाहर (Rahul Chahar) याने 1 गडी बाद केला. आजच्या या सामन्यात भारताचा फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याला आजच्या सामन्यातून वगळण्यात आले आहे. रोहितच्या जागी सलामीवीर म्हणून राहुलला संघात स्थान देण्यात आले होते. मात्र, राहुलला प्रभावी खेळी करता आली नाही. विंडीज दौऱ्यादरम्यान पहिला सामना खेळात असलेला राहुल 20 धावा करत माघारी परतला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif