IND vs WI 3rd ODI: क्रिस गेल याचा अखेरचा सामना, आऊट झाल्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी खास शैलीत केले अभिवादन

या सामन्यात गेल बाद झाल्याबरोबर त्याचे अभिनंदन करण्यासाठी सर्व भारतीय खेळाडू आले. कर्णधार विराट कोहली, केएल राहुल यांच्यासह सर्व भारतीय खेळाडूंचे अभिवादन गेलने त्यांच्याच शैलीत स्वीकारले.

क्रिस गेल (Photo Credit: @AbbasLesnar2/Twitter)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील तिसरा आणि अंतिम वनडे सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर खेळाला जात आहे. या सामन्यात टॉस जिंकून विंडीजने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि विंडीज सलामीवीर क्रिस गेल (Chris Gayle) आणि एव्हिन लुईस यांनी संघाला शतकी सुरुवात करून दिली. गेलने 72 धावा केल्या तर लुईस 43 धावा करत बाद झाला. 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे आजच्या सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. भारत हा सामना जिंकत वनडे मालिका देखील खिशात घालण्याच्या निर्धारित असेल, तर विंडीज संघ मालिका वाचवण्यासाठी खेळात असेल. आजचा हा सामना अजून एका गोष्टीमुळे खास आहे. विंडीजचा धडाकेबाज फलंदाज गेलचा हा करिअरमधील अखेरचा सामना आहे. (IND vs WI 2019: टीम इंडिया मॅनेजर सुनील सुब्रमण्यम यांच्यवर गैरवर्तन केल्याचा आरोप, CoA कडून कडक कारवाईची शक्यता)

भारत विरुद्ध पहिल्या दोन्ही वनडेमध्ये काही खास खेळी करू शकला नाही. पण आज त्याने ती कासार भरून काढली. आज गेलने तूफानी खेळी करत पुन्हा एकदा चौकर आणि शतकारांचा पाऊस पडला. गेल खूपच आक्रमक दिसत होता आणि तो तशीच फलंदाजी करीत होता पण खलील अहमद (Khaleel Ahmed) याच्या चेंडूने त्याचा डाव संपुष्टात आणला. या सामन्यात गेल बाद झाल्याबरोबर त्याचे अभिनंदन करण्यासाठी सर्व भारतीय खेळाडू आले. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul) यांच्यासह सर्व भारतीय खेळाडूंचे अभिवादन गेलने त्यांच्याच शैलीत स्वीकारले. गेल विराट आणि राहुलच्या साथीने आयपीएल संघ, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून अनेक वर्ष खेळली होती. शिवाय, मागील दोनआयपीएलमध्ये गेल राहुलसह किंग्स इलेव्हन पंजाब संघासाठी खेळत आहे.  मैदानाबाहेर जाताना गेलने आपल्या बॅटच्या हँडलवर हेल्मेट अडकवून प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी उभे केले.

या सामन्यात गेलने चांगली फलंदाजी केली. या सामन्यात गेलने 41 चेंडूंत 72 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 175.61 होता. त्याने पहिल्या विकेटसाठी इव्हिन लुईसची साथ मिळवून आपल्या संघाला चांगली सुरुवात दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. कर्णधार विराट कोहलीने गेलला त्याच्याच शैलीत त्याचे अभिनंदन केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif