IND vs WI 2nd Test: दुसऱ्या टेस्टमध्ये कर्णधार विराट कोहली याची नजर एमएस धोनी, रिकी पॉन्टिंग आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या 'या' विक्रमांवर

शुक्रवारीपासून सुरू होणाऱ्या सामन्यात कोहलीने शतक ठोकले तर तो स्मिथचा विक्रम मोडू शकतो.

विराट, स्टिव्ह स्मिथ, रिकी पॉन्टिंग आणि एमएस धोनी (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) दुसऱ्या आणि अंतिम टेस्ट सामन्यासाठी सज्ज आहे. विंडीजविरुद्ध दुसरा आणि अंतिम टेस्ट सामना किंग्स्टन (Kingston), जमैका (Jamaica) येथे खेळवला जाईल. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि विक्रम एकमेकांना पूरक आहेत. कोहली आता त्याच्या करिअरच्या अशा टप्प्यावर उभा आहे जिथे तो जेव्हा सामन्यासाठी मैदानात जाईल तेव्हा काही विक्रम त्याची वाट पाहत असतात. आता विंडीजविरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये देखील कोहली अनेक रेकॉर्ड बनवण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. काही विक्रम कोहली फलंदाजीद्वारे करणार तर आणि काही भारतीय संघ विजयासह मोडेल. या वेळी कोहलीची नजर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith), रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) यांच्या विक्रमांवर आहे. (IND vs WI 2nd Test: दुसर्‍या टेस्टमध्ये फक्त 1 विकेटसह इशांत शर्मा मोडणार कपिल देव यांचा 'हा' विश्वविक्रम, वाचा सविस्तर)

पहिल्या कसोटी सामन्यात विराट काही विशेष खेळ करू शकला नाही. पहिल्या टेस्टच्या पहिल्या डावांत त्याने 12 चेंडूत केवळ 9 धावा केल्या तर दुसऱ्या डावांत 113 चेंडूत 51 धावा करत बाद झाला. आता त्यांच्याकडून आगामी सामन्यासाठी चाहत्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कोहलीने डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात शेवटचे शतक ठोकले होते. शुक्रवारीपासून सुरू होणाऱ्या सामन्यात कोहलीने शतक ठोकले तर तो स्मिथचा विक्रम मोडू शकतो. क्रिकेट विश्वातील सध्याच्या या दिग्गज खेळाडूंनी 25 टेस्ट शतक झळकावले आहेत. इतकेच नाही तर रिकी पाँटिंगने टेस्टमध्ये कर्णधार म्हणून 19 शतके केली आहेत. या लीगमध्येही कोहली 19 शतक करून कर्णधार म्हणून त्याची बरोबरी करू शकतो. अशा परिस्थितीत स्टीव्ह स्मिथ आणि पॉन्टिंगला शतकी खेळीची सुवर्ण संधी कोहलीकडे आहे.

त्याचबरोबर कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत 27 कसोटी सामने जिंकले आहेत. विंडीजविरुद्ध पहिली टेस्ट मॅच जिंकत विराटने महेंद्र सिंह धोनीच्या 27 कसोटी सामन्यांची बरोबरी केली. अशा परिस्थितीत टीम इंडियाने पुढील सामना जिंकल्यास विराटच्या नेतृत्वाखालील हा टीम इंडियाचा हा 28 वा विजय असेल. आणि याचबरोबर तो धोनीचाही हा विक्रम मोडेल आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरेल.

टीम इंडियाचा पुढील आणि अखेरचा कसोटी सामना 30 ऑगस्टपासून जमैका येथे खेळला जाईल. यात कर्णधार कोहलीला हे खास विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif