IND vs WI 2nd Test: वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकत विराट कोहली झाला एमएस धोनी पेक्षा वरचढ, वाचा सविस्तर
या विजयासह कर्णधार कोहलीने टेस्ट करिअरमध्ये एक अनोखा विक्रम निर्माण केला आहे. या विजयासह विराट भारतीय टेस्ट क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. आजचा विजय कोहलीचा कर्णधार म्हणून टेस्टमधील 28 वा विजय होता.
भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज संघाला दुसऱ्या आणि अंतिम टेस्ट सामन्यात 257 धावांनी धूळ चरायला लावली. यासह भारताने टी-20 आणि वनडे मालिकेनंतर टेस्ट मालिकेतदेखील विंडीजचा क्लीन-स्वीप पूर्ण केला. टीम इंडियाच्या या विजयासह कर्णधार कोहलीने टेस्ट करिअरमध्ये एक अनोखा विक्रम निर्माण केला आहे. यासाठी त्याने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला पिछाडीवर टाकले आहेत. अँटिगामध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध भारताने 318 धावांनी जबरदस्त विजय मिळवला. वेस्ट इंडीजविरुद्ध 17 वर्षांच्या विजयी कसोटी विजय मोहिमेला या भारतीय संघाने सुरू ठेवले आहेत. (IND vs WI 2nd Test: टीम इंडियाच्या गालंदाजांची चमकदार कामगिरी, वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट मालिकेत क्लीन-स्वीप पूर्ण)
दरम्यान, या विजयासह विराट भारतीय टेस्ट क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 27 टेस्ट सामने जिंकले आहेत. तर, आजचा विजय कोहलीचा कर्णधार म्हणून टेस्टमधील 28 वा विजय होता. किंग्स्टनमधील सामना जिंकत विराट कर्णधार म्हणून धोनीच्या ही पुढे निघाला आहे. कर्णधार म्हणून धोनीने 60 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाला 27 सामने जिंकून दिले होते, पण कर्णधार कोहलीने अवघ्या 48 सामन्यात टीम इंडियासाठी 28 सामने जिंकून हा विक्रम केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कोहलीने कर्णधार म्हणून मोजक्या सामन्यांत, 28 सामने जिंकण्याचा विक्रम केवळ काही भारतातच नाही तर आशियामध्येही देखील केला आहे. याखेरीज 48 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करूनही सर्वात कमी सामने गमावणारा तो पहिला कर्णधारही आहे. कर्णधार म्हणून कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत केवळ 10 सामने गमावले आहेत. कोहलीने 2014 मध्ये पहिल्यांदा टेस्ट संघाचे कर्णधार पद सांभाळले होते.
इतकेच नव्हे तर दोन वर्ष चाललेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेतही भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहेत. आजच्या विंडीजविरुद्ध विजयासह टीम इंडिया आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत 120 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे.